वर्गातील कपाट अंगावर कोसळून विद्यार्थी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:36 AM2019-07-31T00:36:38+5:302019-07-31T00:37:01+5:30

शहरातील गंगापूररोडवरील एका शाळेत सातवीच्या वर्गात असलेले लोखंडी कपाट अंगावर पडल्याने एक विद्यार्थी ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि.३०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

 Student kills student in classroom closet | वर्गातील कपाट अंगावर कोसळून विद्यार्थी ठार

वर्गातील कपाट अंगावर कोसळून विद्यार्थी ठार

Next

नाशिक : शहरातील गंगापूररोडवरील एका शाळेत सातवीच्या वर्गात असलेले लोखंडी कपाट अंगावर पडल्याने एक विद्यार्थी ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि.३०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, दुपारी विद्यार्थ्यांची वरांड्यात तसेच वर्गात जेवण्याच्या तयारीत असतानाच काही मिनिटांत इयत्ता सातवीच्या वर्गात मोठा आवाज झाला. शिक्षकांसह काही विद्यार्थ्यांनी वर्गाच्या दिशेने धाव घेतली असता लोखंडी मोठे कपाट कोसळून त्याखाली जयेश सखाराम अवतार (वय १२, रा. क्रांतिनगर, पंचवटी) हा विद्यार्थी दबला असल्याचे आढळले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लागलीच कपाट बाजूला करून जखमी जयेशला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविले; मात्र उपचारापूर्व त्याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, दुर्घटनेची माहिती समजताच जिल्हा शासकीय रुग्णालयात जयेशच्या कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांनी धाव घेतली. सरकारवाडा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अनिल बागुल, नाहीद शेख, रवींद्र पानसरे आदींनी जाऊन पंचनामा सुरू केला. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे पथकही त्या वर्गात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पुराव्यांची जमवाजमव पथकाकडून करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title:  Student kills student in classroom closet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.