नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 04:50 PM2018-08-04T16:50:49+5:302018-08-04T16:51:25+5:30

नाशिकरोड : शिक्षण, व्यायाम आणि खेळ ही यशाची त्रिसूत्री आहे. ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास यश निश्चित आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर व्यायामाकडेही लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन भारत संच निगम लिमिटेड नाशिकचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी केले.

Student Honors on behalf of Nashik Shikshan Prasarak Mandal | नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव

googlenewsNext
ठळक मुद्देअभ्यासाबरोबर व्यायामही आवश्यक : महाजन

नाशिकरोड : शिक्षण, व्यायाम आणि खेळ ही यशाची त्रिसूत्री आहे. ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास यश निश्चित आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर व्यायामाकडेही लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन भारत संच निगम लिमिटेड नाशिकचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी केले.
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने धामणकर सभागृह, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमप्रसंगी महाजन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश दाबक होते. महाजन पुढे म्हणाले, गुरुशिवाय प्रगती करू शकत नाही. म्हणूनच गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेने केलेल्या सत्काराने खरा आनंद मिळत असतो, असेही त्यांनी नमूद केले.
व्यासपीठावर ज्ञानेश्वर कुलकर्णी, श्रीपाद देशपांडे, वैशाली गोसावी, प्रसाद कुलकर्णी, कामिनी पवार आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते संस्थेच्या शहरी व ग्रामीण भागातील शाळांमधील इयत्ता दहावी, बारावी व क्रीडा क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरविण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. प्राची सराफ व मेखला रास्वलकर यांनी केले. कार्यक्रमास वसंत जोशी, जयंत मोंढे यांसह संस्थेचे सदस्य, पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Student Honors on behalf of Nashik Shikshan Prasarak Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा