शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
5
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
6
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
7
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
8
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
9
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
10
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
11
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
12
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
13
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
14
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
15
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
16
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
17
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
18
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
19
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
20
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

मेघगर्जनेसह शहरात मान्सूनची जोरदार सलामी; पावसाळापुर्व कामांचे पितळ उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 16:45 IST

शहरात दुपारी दोन वाजेपासून पावसाचे ढग दाटून आले आणि सुर्यप्रकाश पुर्णपणे नाहीसा झाला. वाऱ्याचा वेग अत्यंत कमी राहिल्यामुळे टपो-या थेंबांसह जोरदार सरींचा वर्षाव शहरात सुमारे तासभर झाला.

ठळक मुद्देसाधारणत: तासभर पावसाने हजेरी लावलीतीन वाजेपासून मुसळधार पावसाला सुरूवात गटारी रस्त्यांवरून ओसंडून वाहू लागल्याने दुर्गंधी पसरली

नाशिक : शहर व परिसरात शुक्रवारी (दि.१२) मान्सून सरींनी जोरदार सलामी दिली. हवामान खात्याकडून रविवारपासून जिल्ह्यात पावसाला सुरूवात होईल असा अंदाज वर्तविला गेला होता; मात्र दोन दिवस अगोदरच मान्सूनने शहरात हजेरी लावल्याने आता बळीराजासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महापालिकेने पावसाळापुर्र्व केलेल्या गटारी व नालेसफाईच्या कामांचे पितळ नाशिककरांसमोर उघडे पडले.नाशिक शहरासह जिल्ह्यात किंबहुना राज्यातसुध्दा ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे यंदा मान्सून ७ जून ऐवजी १५ जूनला बरसणार असा क यास हवामान विभागाने लावला होता; मात्र केरळमधून पुढे महाराष्टÑाच्या दिशेने मान्सूनची वाटचाल वेगाने झाली. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपासून पावसाच्या दमदार सरी शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये कोसळल्या. वाऱ्याचा वेग अत्यंत कमी राहिल्यामुळे टपो-या थेंबांसह जोरदार सरींचा वर्षाव शहरात सुमारे तासभर झाला. शहरात दुपारी दोन वाजेपासून पावसाचे ढग दाटून आले आणि सुर्यप्रकाश पुर्णपणे नाहीसा झाला. काही भागात त्वरित अडीच वाजेपासून पावसाच्या सरींचे आगमन झाले तर काही उपनगरांमध्ये तीन वाजेपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. साधारणत: तासभर पावसाने हजेरी लावली.

यामुळे परिसरातील रस्ते जलमय झाले होते. अनलॉकमुळे व्यावसायिकांनी आपआपली दुकाने सकाळपासूनच उघडली होती. अचानकपणे आलेल्या पावसामुळे काही प्रमाणात व्यावसायिकांसह रस्त्यांवरील लहान विके्रत्यांचीसुध्दा तारांबळ उडाली. पावसाने आपला माल भिजणार नाहीत, याची खबरदारी विक्रेत्यांकडून घेतली जात होती. पाणकापडाच्या सहाय्याने तत्काळ माल झाकून ठेवण्याची विक्रेत्यांची लगबग भद्रकाली, रविवार कारंजा, मेनरोड, शालिमार, पंचवटी, नाशिकरोड या भागात पहावयास मिळाली.पहिल्याच पावसात महापालिकेच्या भुयारी गटार व पावसाळी गटारींची दैनावस्था झाली. महापालिका प्रशासनाने पावसाळापुर्व केलेल्या कामांचे पितळ उघडे पडले. अक्षरश: गटारी रस्त्यांवरून ओसंडून वाहू लागल्याने राजेबहाद्दर लेन, सारस्वत नाला, दहीपूल, कानडे मारूती लेन, भद्रकाली, दुधबाजार, या भागात गटारी रस्त्यांवर अवतरल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती.

गटारींचे काळेकुट्ट सांडपाण्याचे पाट रस्त्यांवरून ओसंडून वाहत असल्याचे बघून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाळ्यापुर्व गटारींची स्वच्छता किती चांगल्या पध्दतीने महापालिकेच्या संबंधित विभागाकडून करण्यात आली, याचा पुरावा मान्सूनच्या सलामीने नाशिककरांसमोर आला. त्यामुळे यावर्षीसुध्दा पावसाळ्यात पुन्हा एकदा सराफबाजारापासून तर थेट दहीपूलापर्यंत पाण्याचा तलाव साचणार की काय? अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊसgodavariगोदावरी