राजकीय पक्षांसह इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST2021-09-05T04:19:08+5:302021-09-05T04:19:08+5:30

कळवण मनोज देवरे लोकमत न्यूज नेटवर्क कळवण : येथील नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणशिंग डिसेंबर २०२१ मध्ये फुंकले जाणार ...

Strong front formation by aspirants including political parties | राजकीय पक्षांसह इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी

राजकीय पक्षांसह इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी

कळवण

मनोज देवरे

लोकमत न्यूज नेटवर्क

कळवण :

येथील नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणशिंग डिसेंबर २०२१ मध्ये फुंकले जाणार असून, २०२२ मध्ये निवडणूक होण्याची शक्यता निवडणूक आयोगाने वर्तविली आहे. ओबीसी आरक्षण जागांच्या मुद्यावरुन निवडणूक लांबण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे. स्थानिक पातळीवर राजकीय पक्षासह इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरु केले आहे. सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे, माकपा यांचे स्वबळाचे प्रयत्न असले तरी कळवणमध्ये व्यक्तीद्वेषाचे आणि व्यक्तीकेंद्रित राजकारण असल्यामुळे कोणाकोणाचे राजकीय समीकरण जुळणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कळवण नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने विकासाला साथ देताना सतत जनसंपर्क असलेल्यांना प्राधान्य

दिले. लक्ष्मीचे दर्शन घडविणाऱ्यांना आपलेसे करताना नाकारण्याची देखील भूमिका घेतली. अपक्षांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारांची झोप उडवून ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले होते.

नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून बिघाडी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस स्वबळावर लढली.

भाजप शिवसेना यांनी युतीचा धर्म पाळला. मनसे व बसपानेदेखील निवडणुकीत नशीब आजमावले. आमदारकी असूनही माकपाचे उमेदवार उभे केले नाहीत.अपक्षांनी राजकीय उमेदवारापुढे आव्हान उभे केल्यामुळे नगरपंचायतीच्या १७ जागा लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व्यतिरिक्त कुठल्याही पक्षाला १७ उमेदवार मिळाले नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता पगार यांची प्रभाग क्र १ मधून बिनविरोध निवड झाल्यामुळे राष्ट्रवादीचे हौसले बुलंद झाले होते. उर्वरित

१६ जागांसाठी ७४ उमेदवारांनी निवडणुकीत नशीब आजमावले होते त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने १७ व काँग्रेस १० व मनसे ४ जागा स्वबळावर तर भाजप सेना युतीने १६ जागा लढवल्या.कळवण शहर विकास आघाडीची स्थापना होऊन काही जागावर उमेदवार उभे केले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागा भाजपने ४,काँग्रेस ३,शिवसेनेला १ तर अपक्षांनी २ जागांवर विजय मिळविला. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कौतिक पगार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कळवणला केला. आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेचे गणित जुळवून पाच वर्षे सत्तेचा करिष्मा कायम ठेवला. शहरातील अंतर्गत रस्त्याचा विकास करुन ६७ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावली. २५ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली, त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

प्रथम नगराध्यक्षपदाचे आरक्षण इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षण निघाल्याने पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान गटनेते कौतिक पगार यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या सुनीता पगार यांना मिळाला तर द्वितीय नगराध्यक्षाचा मान काँग्रेसला देत माजी आमदार काशिनाथ बहिरम यांचे पुत्र मयूर बहिरम व रोहिणी महाले यांना देऊन राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळला.

सध्याच्या राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडीचा प्रयोग स्थानिक पातळीवर राबविला गेला तर त्यात आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने शहरांत विकासकामे उभी केली असल्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त आहे.

शिवाय विद्यमान काही नगरसेवकांवर जनतेची नाराजी आहे. निवडून आल्यानंतर त्यांचे प्रभागातील दर्शन दुर्लभ झाले त्यामुळे उमेदवार देताना नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. राष्ट्रवादीवर नाराज झालेले उमेदवार भाजपाचे उमेदवार राहतील. राष्ट्रवादीच्या चालीवर यंदा भाजपा चाल खेळणार असून राष्ट्रवादी बरोबर भाजपने स्वबळावर १७ जागा लढविण्याचा निर्धार केला आहे. ऐनवेळी काही समीकरणे जुळून येऊन आमदार विरोधी गट भाजपला मदत करतील.काँग्रेसने नवीन नेतृत्वाला संधी दिली असल्यामुळे ते देखील निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्यामुळे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरुन भाऊबंदकीचे राजकारण उफाळून येणार आहे. मनसेनेदेखील तयारी सुरु केली असून माकपकडून उमेदवार चाचपणी सुरु आहे. नगरपंचायत निवडणुकीत आमदार नितीन पवार, माजी आमदार जे. पी. गावीत यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून इतर नेते,उपनेते कोणाशी जुळवून घेणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

कळवण शहरातील १७ प्रभागातील नागरिकांकडून सुचविलेल्या अपेक्षित विकासकामांचा नियोजनबद्धरित्या आराखडा तयार करुन शासनस्तरावर सादर केला.

040921\04nsk_40_04092021_13.jpg~040921\04nsk_41_04092021_13.jpg~040921\04nsk_42_04092021_13.jpg

रोहिणी महाले~सुधाकर पगार~कळवण नगरपंचायत

Web Title: Strong front formation by aspirants including political parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.