नाशिक रोडला मुस्लीम बांधवांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 01:34 IST2021-11-13T01:33:46+5:302021-11-13T01:34:22+5:30

त्रिपुरातील जातीय हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लीम समाजाने पुकारलेल्या बंदला शुक्रवारी नाशिक रोड परिसरात व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Strict closure of Muslim brothers on Nashik Road | नाशिक रोडला मुस्लीम बांधवांचा कडकडीत बंद

नाशिक रोडला मुस्लीम बांधवांचा कडकडीत बंद

नाशिकरोड : त्रिपुरातील जातीय हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लीम समाजाने पुकारलेल्या बंदला शुक्रवारी नाशिक रोड परिसरात व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुस्लीम समाजातील सर्व व्यावसायिकांनी त्यांची दुकाने, व्यवसाय बंद ठेवून त्रिपुरातील जातीय दंगलीचा निषेध केला. त्रिपुरात काही दिवसांपूर्वी जातीय हिंसाचार होऊन दंगल उसळली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात शुक्रवारी मुस्लीम समाजाने बंद पुकारला होता. त्या बंदला नाशिक रोड परिसरात प्रतिसाद लाभला. परिसरातील सर्वच मुस्लीम समाजातील व्यावसायिकांनी त्यांचे व्यवसाय, व्यवहार, दुकाने बंद ठेवून जातीय दंगलीचा निषेध व्यक्त केला.

Web Title: Strict closure of Muslim brothers on Nashik Road