पतसंस्था चळवळ बळकट करा निवेदन : जिल्हा पतसंस्था फेडरेशनची सहकारमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:10 IST2018-03-10T00:10:25+5:302018-03-10T00:10:25+5:30
सोनांबे : खेड्यापाड्यात पोहोचलेली व सर्वसामान्यांची आर्थिक ‘पत’ निर्माण करणारी पतसंस्था चळवळ सध्या अनेक आव्हानांना तोंड देत असून, सहकार विभागाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन ही चळवळ अधिक बळकट करावी.

पतसंस्था चळवळ बळकट करा निवेदन : जिल्हा पतसंस्था फेडरेशनची सहकारमंत्र्यांकडे मागणी
सोनांबे : खेड्यापाड्यात पोहोचलेली व सर्वसामान्यांची आर्थिक ‘पत’ निर्माण करणारी पतसंस्था चळवळ सध्या अनेक आव्हानांना तोंड देत असून, सहकार विभागाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन ही चळवळ अधिक बळकट करावी, असे आवाहन करत जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष भास्कर कोठावदे यांच्यासह पदाधिकाºयांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना दिले.
सहकारमंत्री दोन दिवसांपूर्वी सिन्नर दौºयावर आले होते. यावेळी जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाºयांनी त्यांची भेट घेऊन पतसंस्था चळवळीसंदर्भात चर्चा करून विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी नारायण वाजे, सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष युनूस शेख, जी. एल. पवार, रामनाथ डावरे, कैलास क्षत्रिय आदींसह फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.