स्टोअर मॅनेजरने केला चार लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:40 IST2018-11-20T22:44:30+5:302018-11-21T00:40:43+5:30

बाटा शूज कंपनीतील स्टोअर मॅनेजरने कंपनीच्या मालाची चोरी करून त्याची परस्पर विक्री करून चार लाखांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी स्टोअर मॅनेजर विशाल दिलीपसिंग पाटील (रा. अतुल डेअरीजवळ, सिडको,) विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे़

Store manager killed four lakhs | स्टोअर मॅनेजरने केला चार लाखांचा अपहार

स्टोअर मॅनेजरने केला चार लाखांचा अपहार

नाशिक : बाटा शूज कंपनीतील स्टोअर मॅनेजरने कंपनीच्या मालाची चोरी करून त्याची परस्पर विक्री करून चार लाखांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी स्टोअर मॅनेजर विशाल दिलीपसिंग पाटील (रा. अतुल डेअरीजवळ, सिडको,) विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे़
बाटा कंपनीचे औरंगाबाद येथील अधिकारी सय्यद आरसालान एनुलहक्क यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार १० डिसेंबर २०१७ ते २० मार्च २०१८ या कालावधीत विशाल पाटील हे मेनरोडवरील बाटा शूज स्टोअर्समध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून काम करीत होते़ या कालावधीत त्यांनी कंपनीच्या मालकीचे ३ लाख ७२ हजार ८४ रुपयांचे शू पेपर व १८ हजार ८६० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३ लाख ९० हजार ९४५ रुपयांचा अपहार करून फसवणूक केली़ चोरी केलेला माल वा अपहाराची रक्कम कंपनीला परत न करता २९ एप्रिल २०१८ पासून विशाल पाटील फरार झाला़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़

Web Title: Store manager killed four lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.