दिंडोरीत माकपचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:37 IST2020-11-27T00:36:39+5:302020-11-27T00:37:08+5:30
भाजप सरकारच्या धोरणाविरोधात दिंडोरी, पेठ, सुरगाणा व कळवण तालुक्यात अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली सेंटर ऑफ इंंडियन ट्रेड युनियन्स, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, स्टुडण्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

दिंडोरीत माकपचा रास्ता रोको
दिंडोरी : भाजप सरकारच्या धोरणाविरोधात दिंडोरी, पेठ, सुरगाणा व कळवण तालुक्यात अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली सेंटर ऑफ इंंडियन ट्रेड युनियन्स, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, स्टुडण्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दिंडोरी येथील मुख्य चौकात माकपचे जिल्हा सेक्रेटरी सुनील मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १ तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे चारही बाजूंंनी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी तालुका सेक्रेटरी रमेश चौधरी, किसान सभा तालुकाध्यक्ष देवीदास वाघ, डीवायएफचे तालुकाध्यक्ष आप्पा वटाणे, जनवादी महिला तालुकाध्यक्षा लक्ष्मीबाई काळे, रमेश चतुर, दत्ता ठाकरे, गोटीराम भोई, हिरामण गायकवाड, श्रीराम पवार, दौलत भोये, परशराम गांगुर्डे, अंबादास सोनवणे, सखाराम कडाळे, तुळसाबाई गांगोडे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.