जनावरांची वाहतूक रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:07 IST2018-12-10T23:06:48+5:302018-12-10T23:07:01+5:30
इंदिरानगर : वडाळागावातील घरकुल योजना समोर तीन गोवंश जातीची जनावरे अवैधरीत्या कतलीसाठी घेऊन जाणाऱ्या जीपसह सुमारे ३ लाख ४ हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोघे संशयित साबीर शेख व अलकबीर शेख यांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे.

जनावरांची वाहतूक रोखली
इंदिरानगर : वडाळागावातील घरकुल योजना समोर तीन गोवंश जातीची जनावरे अवैधरीत्या कतलीसाठी घेऊन जाणाऱ्या जीपसह सुमारे ३ लाख ४ हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोघे संशयित साबीर शेख व अलकबीर शेख यांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे.इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोधपथक गस्तीवर असताना उपनिरीक्षक रोहित शिंदे यांना कलानगर चौकातून वडाळा गावाकडे जाणाºया रस्त्यावरून एक पांढरी बोलेरो-पिकअप जीपमध्ये गोवंश या जातीचे जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार आहे, अशी गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार तातडीने त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे यांना माहिती देत वडाळागावातील घरकुल प्रकल्पाजवळ सापळा रचला.
आठ वाजेच्या दरम्यान कलानगर चौकाकडून वडाळा गावाकडे जीप (एम.एच १५ ए जी ६२२३) येताना दिसली तातडीने पोलिसांनी जीप अडविली. यावेळी विचारपूस केली असता जीपमधील संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी पोलिसांचा संशय बळावल्याने जीपची झडती घेतली असता पाठीमागे तीन जीवंत गोवंश जातीची जनावरे आढळली. यावेळी पोलिसांनी जनावरांसह जीप ताब्यात घेतली. दोघे संशयित हे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशीलनगर येथे राहणारे असून त्यांची चौकशी करुन अटक करण्यात आली आहे.