Stones were hurled at the dispersing police | गर्दी पांगविणाऱ्या पोलिसांवरच दगडफेक

गर्दी पांगविणाऱ्या पोलिसांवरच दगडफेक

ठळक मुद्देदेवळाली कॅम्प : दोघे जखमी; भगूरला धारदार शस्त्राने हल्ला

देवळाली कॅम्प : परिसरात शिवजयंती उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर चारणवाडी येथील काही समाजकंटकांनी येथील त्रिमूर्ती चौकात झालेली गर्दी पांगविण्यासाठी आलेल्या पोलिसांवरच थेट समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेत पोलीस शिपाई मनोहर साळुंखे तर पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला टाके पडले आहेत. 
याबाबत पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत कर्तव्यावर असताना संसरी येथील चारणवाडी येथे दोघा पोलिसांवर दगडफेक करून संशयित समाजकंटकांनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आहेर, साळुंखे यांच्या डोक्यास गंभीर मार लागला आहे. दोघांना उपचारासाठी देवळाली छावणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या समाजकंटकांना पांगविण्यासाठी पोलिसांना पुन्हा एकदा बळाचा वापर करत गर्दी पांगवावी लागली. 
याप्रकरणी चारणवाडी येथून संशयित शंकर सुरेश देवकर, श्रावण माने, रोहित कुसमाडे, दीपक नलावडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित नऊ  संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या गुन्ह्यात एकूण १४ संशयितांविरुध्द सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल माजवून कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचविण्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
हाणामारीच्या घटनेत एक जण गंभीर
n भगुर येथेही रात्री अकरा वाजेच्यादरम्यान गायकवाड गल्लीत सेल्फी काढताना धक्का लागल्याचा राग आल्याने दोन युवकांमध्ये वाद निर्माण झाला. एकाने धारधार वस्तू काढून दुसऱ्याच्या डोक्यावर मारली. 
n  या घटनेत एकाला गंभीर दुखापत झाली असून संशयिताने घटनास्थळावरून पळ काढल्याचे नागरिकांनी सांगितले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद होऊ शकलेली नाही.
तत्काळ पोलीस बंदोबस्त तैनात
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त विजय खरात व सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चंद्र देशमुख व सहायक पोलीस निरीक्षक राहुल मोरे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. 

Web Title: Stones were hurled at the dispersing police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.