नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; ४ ते ५ पोलीस जखमी
By अझहर शेख | Updated: April 16, 2025 07:47 IST2025-04-16T07:46:56+5:302025-04-16T07:47:20+5:30
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. जमावावे बॅरीकेड्सचेही नुकसान केले.

नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; ४ ते ५ पोलीस जखमी
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय व वाहतूक शाखेच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव काठेगल्ली सिग्नल ते वडाळारोडवरील नागजी सिग्नल चौकापर्यंतचा मुख्य रस्ता बुधवारी रात्री १२ वाजेपासून शुक्रवारी रात्रीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येत असताना अचानक चालून आलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना मध्यरात्री १२.३० वाजता घडली. या घटनेत चार ते पाच पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. जमावावे बॅरीकेड्सचेही नुकसान केले.
घटनेचे वृत्त कळताच राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तातडीने घटनास्थळी दाखल करण्यात आली. दलाने लाठीचार्ज करत जमावाला पांगवले. रात्री १.१५ वाजेपर्यंत या भागातील तणावग्रस्त परिस्थिती आटोक्यात आणण्यात पथकाला यश आले.
दरम्यान, या घटनेत युवराज पत्की नामक पोलिसास दगड लागल्याने ते जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता द्वारकाकडे येणारे अनेक रस्ते बंद करण्यात आले. पोलिसांनी काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली.