नाशिकमध्ये मनपा अतिक्रमण पथकावर दगडफेक; जेसीबीच्या काचा फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 14:04 IST2023-05-30T14:04:11+5:302023-05-30T14:04:22+5:30
हनुमानवाडी पाटालगत महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग कर्मचारी अनधिकृत झोपड्यांचे अतिक्रमण काढले.

नाशिकमध्ये मनपा अतिक्रमण पथकावर दगडफेक; जेसीबीच्या काचा फोडल्या
संदीप झिरवाळ
नाशिक : शहरातील पेठरोड परिसरात असलेल्या हनुमानवाडी पाटालगत महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग कर्मचारी अनधिकृत झोपड्यांचे अतिक्रमण काढत असताना झोपडपट्टीतील नागरिकांनी अतिक्रमण विभागाच्या पथकावर दगडफेक करत मनपा जेसीबीच्या काचा फोडण्याची घटना आज घडली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागा मार्फत आज पोलीस बंदोबस्तात झोपड्या हटविण्याचे काम सुरू होते त्याच दरम्यान झोपडपट्टीत राहणाऱ्या काही महिलांनी महिला पोलीस कर्मचारी तसेच मनपा पथकाशी वाद घालत एका युवकाने थेट जेसीबीच्या समोर येत जेसीबी वर दगडफेक करत काचा फोडल्या यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता या घटनेनंतर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या युवकाला तसेच गोंधळ घालणाऱ्या काही महिलांना ताब्यात घेतले.