धुळे येथील चोरीला गेलेले एटीएम सापडले वाके धरणाजवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 17:52 IST2018-11-04T17:52:44+5:302018-11-04T17:52:58+5:30
मालेगाव : धुळे शहरातील मालेगाव रस्त्यावर अग्रसेन चौकात असलेले आयसीआयसीआय बॅँकेचे चोरीला गेलेले एटीएम यंत्र मालेगाव तालुक्यातील वाके गावानजीक असलेल्या धरणाजवळ रविवारी सकाळी आढळून आले.

धुळे येथील चोरीला गेलेले एटीएम सापडले वाके धरणाजवळ
मालेगाव : धुळे शहरातील मालेगाव रस्त्यावर अग्रसेन चौकात असलेले आयसीआयसीआय बॅँकेचे चोरीला गेलेले एटीएम यंत्र मालेगाव तालुक्यातील वाके गावानजीक असलेल्या धरणाजवळ रविवारी सकाळी आढळून आले. सदर मशिन गॅस कटरने कापले असून घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले.
धुळ्याच्या अग्रसेन चौकात असलेल्या व्यापार संकुलातील गाळ्यात असलेले आयसीआयसीआय बॅँकेच्या दोन एटीएम यंत्रापैकी एक संपूर्ण यंत्रच चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी पहाटे घडली होती. या यंत्रामधुन पैशांची लूट न करता थेट ते यंत्रच जमिनीपासून वेगळे करुन चोरुन नेले होते. या यंत्रात २२ लाख ४४ हजार ८०० रुपये आणि ३ लाखांचे एटीएम मशिन असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला होता. तपासासाठी इंदौर, साक्री व मनमाड या दिशेला पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. मालेगाव तालुक्यातील वाके येथे एका धरणाच्या शेजारी ग्रामस्थांना सदर एटीएम यंत्र फेकलेले आढळून आले. ग्रामस्थांनी मालेगाव तालुका पोलीसांना ही माहिती दिली.