शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

गॅस चोरून सिलिंडरमध्ये भरणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:16 IST

स्वयंपाकाचा एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाºया शहरातील एका एजन्सीच्या टेम्पोचालकाला गॅसचोरी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. गॅस ट्रान्सफर निप्पलद्वारे रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरणा करण्याचा त्याचा अमृतधाममधील अड्डा गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केला.

नाशिक : स्वयंपाकाचा एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाºया शहरातील एका एजन्सीच्या टेम्पोचालकाला गॅसचोरी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. गॅस ट्रान्सफर निप्पलद्वारे रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरणा करण्याचा त्याचा अमृतधाममधील अड्डा गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केला. विविध गॅस एजन्सीमार्फत स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर घरोघरी पोहचविणाºया काही टेम्पोचालक व त्यावरील कामगारांकडून संगनमताने गॅस चोरी करून ग्राहकांना कमी वजनाचे सिलिंडर देत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने चाचपणी सुरू केली असता मखमलाबादजवळील भारत गॅसच्या गुदामामधून घरोघरी गॅस सिलिंडर पोहचविणारा टेम्पोचालक संजय खंडूजी चव्हाण (४२, रा. विहार कॉलनी) हा संशयित टेम्पोचालक आपल्या टेम्पो (एमएच १५, एफव्ही १६४९) मध्ये सिलिंडर भरल्यानंतर ग्राहकांना सिलिंडर देण्यापूर्वी त्यामधील काही प्रमाणात गॅस राहत्या घराजवळील मोकळ्या भूखंडावर ट्रान्सफर निप्पलद्वारे रिकाम्या सिलिंडरमध्ये भरणा करत होता. त्यामुळे या भागातील नागरिकांना कमी वजनाच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा होत होता. याबाबतची गुप्त माहिती सहायक निरीक्षक दीपक गिरमे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला.रंगेहाथ पकडलेअमृतधाम परिसरात छापा टाकून टेम्पोचालकाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून  १३ सिलिंडर, तानकाटा, गॅस ट्रान्सफर निप्पल असा एकूण दोन लाख ३६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय