शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

बरखास्तीची टांगती तलवार कायम

By admin | Updated: January 21, 2016 22:58 IST

जिल्हा बॅँक : सहकार खात्याने मागविली माहिती

नाशिक : घोटाळेबाज संचालकांना दहा वर्षे निवडणुकांना बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने नाशिक जिल्हा सहकारी बॅँकेवर बरखास्तीची टांगती तलवार कायम आहे. त्यातच गुरुवारी (दि. २१) तडकाफडकी सहकार आयुक्तांनी २००० नंतर प्रशासकीय मंडळ किंवा प्रशासक नियुक्तीची माहिती मागविल्याने संचालक मंडळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, काल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची संचालक मंडळाची मासिक बैठक गणपूर्तीअभावी (पान ७ वर)तहकूब करण्याची नामुष्की दुसऱ्यांदा अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यावर ओढवली. याआधीही सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीवरून उठलेल्या वादंगवेळी संचालकांनी बहिष्कार टाकल्याने बैठक तहकूब करण्याची वेळ दराडेंवर आली होती. कालही बैठकीत ११ संचालकांची गणपूर्ती आवश्यक असताना सात ते आठच संचालक बैठकीस उपस्थित असल्याने बैठक माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव अहेर यांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली.काल राज्याचे सहकार आयुक्त कार्यालयाने सन-२००० पासून रिझर्व्ह बॅँकेचे सूचनेनुसार कलम ११० अ‍े अन्वये प्रशासक / प्रशासक मंडळ नियुक्त झालेल्या नागरी सहकारी बॅँकांच्या तत्कालीन संचालक मंडळाची माहिती चार विहित नमुन्यात मागविली. शिवाय ही माहिती दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तत्काळ पाठविण्याचे आदेश असल्याने जिल्हा बॅँकेच्या प्रशासनाने ही माहिती तत्काळ पाठविल्याचे कळते. त्यात जिल्ह्णाचे नाव, बॅँकेचे नाव, प्रशासक नियुक्ती दिनांक व तत्कालीन संचालक मंडळ सदस्यांची यादी या नमुन्यात ही माहिती पाठविण्यात आल्याचे कळते. जिल्हा बॅँकेवर यापूर्वी २०१३ मध्ये नाबार्डच्या आदेशानुसार संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे दोन वर्षांच्या कालखंडापर्यंत सुरुवातीला प्रशासक व नंतर प्रशासकीय मंडळ कार्यरत होते. या काळात संचालक असलेले सुमारे ११ संचालक आताही कार्यरत आहेत. त्यात अध्यक्ष नरेंद्र दराडे, आमदार जे. पी. गावित, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, परवेज कोकणी, धनंजय पवार, गणपतराव पाटील, अद्वय हिरे व जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. संदीप गुळवे यांचा समावेश आहे. सहकार खात्याने माहिती मागविल्याने अपात्र ठरण्याची शक्यता असलेल्या संचालकांनी लगोलग कायदेशीर बाबी तपासल्याचे कळते. (प्रतिनिधी)