जुन्या पंडित कॉलनीतील वसतिगृहात चोरी
By Admin | Updated: October 20, 2015 23:20 IST2015-10-20T23:19:53+5:302015-10-20T23:20:42+5:30
जुन्या पंडित कॉलनीतील वसतिगृहात चोरी

जुन्या पंडित कॉलनीतील वसतिगृहात चोरी
नाशिक : जुन्या पंडित कॉलनीतील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात चोरी झाली असून, चोरट्यांनी ९० हजारांचा ऐवज चोरून नेला. माहेश्वरी विद्यार्थी भवनमधील विद्यार्थी प्रवीण सुनील लाहोरी (२१, निफाड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी खोलीतील किमती मोबाइल, सोन्याची साखळी व लॅपटॉप असा ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़