पर्यावरण संदेशासह प्रणालीचे राज्यभर सायकल भ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 01:36 IST2021-03-13T01:35:57+5:302021-03-13T01:36:16+5:30

यवतमाळच्या वणी येथील प्रणाली चिकटे या युवतीने गतवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पर्यावरण स्वच्छतेच्या संदेशासह सायकलवर राज्यभ्रमणास प्रारंभ केला. शुक्रवारी हाच संदेश घेऊन ती नाशिकला दाखल झाली आहे. 

Statewide cycle tour of the system with environmental message | पर्यावरण संदेशासह प्रणालीचे राज्यभर सायकल भ्रमण

पर्यावरण संदेशासह प्रणालीचे राज्यभर सायकल भ्रमण

नाशिक : यवतमाळच्या वणी येथील प्रणाली चिकटे या युवतीने गतवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पर्यावरण स्वच्छतेच्या संदेशासह सायकलवर राज्यभ्रमणास प्रारंभ केला. शुक्रवारी हाच संदेश घेऊन ती नाशिकला दाखल झाली आहे. 
सायकल भ्रमण करीत प्रणाली नाशिकला आल्यानंतर नाशिक सायकलिस्ट फेडरेशनच्या वतीने प्रणालीचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. तसेच तिच्या या उपक्रमाबद्दल आणि पर्यावरण रक्षणाच्या संकल्पासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रणालीला एनसीएफचा टी-शर्ट, आरोग्य सम्राज्ञीचा सॅश आणि मुकुट देऊन सन्मानित करण्यात आले. 

Web Title: Statewide cycle tour of the system with environmental message