चांदवड तालुका किसानसभेचे वतीने तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 18:28 IST2020-07-17T18:27:48+5:302020-07-17T18:28:08+5:30
चांदवड - कांद्याला ५०० रुपये अनुदान द्यावे, वीजबील माफ करावे व इतर मागण्यासाठी अखिल भारतीय कि सान सभेच्या चांदवड तालुक्याच्या वतीने चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन दिले.

चांदवड तालुका किसानसभेचे वतीने तहसीलदारांना निवेदन
चांदवड - कांद्याला ५०० रुपये अनुदान द्यावे, वीजबील माफ करावे व इतर मागण्यासाठी अखिल भारतीय कि सान सभेच्या चांदवड तालुक्याच्या वतीने चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन दिले.
निवेदनात उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावेक, विज वितरण कंपनीने दिलेले संपुर्ण बील माफ करावे, कोरोना काळात शेती व शेतकरी विरोधात काढलेले सर्व आदेश मागे घ्यावेत, शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी दयावी, शेतकऱ्यांचे पिक कर्ज, खते त्वरीत उपलब्ध करुन देण्यात यावेत, आयकर न भरणाºया कुंटूबांना दरमहा ७५०० रुपये कोविडसाठी प्रत्येक कुंटूबाला देण्यात यावे, प्रत्येक कुंटूबाला प्रति व्यक्ती दहा किलो धान्य द्यावे, डिझेल, पेट्रोलचे दरवाढ मागे घ्यावी, ६० वर्षावरील शेतकरी , शेतमजुर कारागीर यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्या, आरोग्य कायद्याची केरळच्या पध्दतीने अंमलबजावणी करा, १४ वर्षाखालील मुलांना सर्व माध्यमाचे मोफत शिक्षण द्या, मनरेगाचे कामात शेतकºयांच्या बांधावरील कामांचा समावेश करा, मजुरी ३०० रुपये द्या, कसत असलेल्या वनजमिनी गायरान जमीनी त्वरीत नांवावर करा, नाशिक जिल्हयातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांना फसविणाºया व्यापाºयांचा शोध घेऊन शेतकºयांना पैसे मिळून देण्यास मदत करावी अदिसह असंख्य मागण्याचा समावेश होता.