वादळी वाऱ्यामुळे नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 00:28 IST2021-05-31T19:29:37+5:302021-06-01T00:28:21+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे येथील नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानींचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी याबाबतचे निवेदन पिंपळगाव डुकरा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान वाकचौरे हस्ते ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत इगतपुरीचे तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना देण्यात आले आहे.

पिंपळगाव डुकरा येथील शेतकऱ्यांचे वादळी पावसामुळे पोल्ट्रीचे झालेले नुकसान.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे येथील नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानींचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी याबाबतचे निवेदन पिंपळगाव डुकरा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान वाकचौरे हस्ते ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत इगतपुरीचे तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना देण्यात आले आहे.
इगतपुरी तालुक्यातील साकूर, पिंपळगाव डुकरा, पिंपळगाव घाडगा परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या घरांचे छप्पर उडाल्यामुळे तसेच जनावरांच्या पडवीसह मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पिंपळगाव डुकरा येथील शेतकरी योगेश नंदू वाकचौरे यांच्या गट क्रमांक ४०९ मधील पोल्ट्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, पोल्ट्रीवरील सर्व पत्रे उडाले. या नुकसानीमुळे सदर नुकतेच बांधलेल्या शेडचे लाखोचे नुकसान झाल्याचे समजते. यामुळेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी यासाठी पिंपळगाव डुकराचे सरपंच यांच्यासह परिसरातील सरपंच व पदाधिकारी यांनी इगतपुरीचे तहसिलदार परमेश्वर कासुळे यांची भेट घेत त्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी सरपंच भगवान वाकचौरे, देविदास देवगिरे, गणेश टोचे, साहेबराव बाबळे, अशोक बोराडे, दिलीप पोटकुळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.