गृहमंत्र्यांंच्या राजीनाम्यासाठी भाजपातर्फे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 20:10 IST2021-03-22T20:09:50+5:302021-03-22T20:10:27+5:30
निफाड : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे जे आरोप केले ते आरोप धक्कादायक असून गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदन सोमवारी (दि.२२) निफाड शहर भाजपाच्या वतीने निफाडच्या निवासी नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना देण्यात आले.

निफाडच्या निवासी नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना निवेदन देतांना भाजपाचे शंकर वाघ, सचिन धारराव, मंजुश्री थोरात , बिरजू पठाण, किरण पवार, गौरव कुंदे, भीमराज साळुंखे, वैभव बोराडे,अशोक पवार, शंकर पवार आदी.
निफाड : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे जे आरोप केले ते आरोप धक्कादायक असून गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदन सोमवारी (दि.२२) निफाड शहर भाजपाच्या वतीने निफाडच्या निवासी नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना देण्यात आले.
सदर निवेदन देताना भाजपा ओ.बी.सी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस शंकर वाघ, भाजपाचे निफाड शहराध्यक्ष सचिन धारराव, महिला ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष मंजुश्री थोरात, अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष बिरजू पठाण, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पवार, गौरव कुंदे, भीमराज साळुंखे, वैभव बोराडे, अशोक पवार, शंकर पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.