राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा : पिस्तुल नेमबाजीत नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांना रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 21:43 IST2018-01-11T21:43:23+5:302018-01-11T21:43:55+5:30

परिक्षेत्रस्पर्धा गाजविल्यानंतर खेळाडूंना सदर राज्यस्तरावरील स्पर्धेत आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळते.

State Police Sports Competition: Nashik Police Commissioner Dr. Silver for Ravindra Kumar Singhal | राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा : पिस्तुल नेमबाजीत नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांना रौप्य

राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा : पिस्तुल नेमबाजीत नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांना रौप्य

नाशिक : मुंबई येथे झालेल्या तीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत झालेल्या पिस्तुल शुटींग नेमबाजी क्रीडा प्रकारात नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी रौप्य पदक पटकाविले.
या स्पर्धेत पात्र होण्यासाठी प्रथम जिल्हास्तरावर अर्थात आयुक्तालय स्तरावर होणा-या क्रिडा प्रकारापासून उत्कृष्ट कामगिरी अधिका-यांना अर्थात खेळाडूंना करावी लागते. आयुक्तालयस्तरावर झालेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर त्या खेळाडूंची निवड परिक्षेत्र स्तरावर होणा-या स्पर्धेसाठी केली जाते. परिक्षेत्रस्पर्धा गाजविल्यानंतर खेळाडूंना सदर राज्यस्तरावरील स्पर्धेत आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळते. सिंगल यांनी या स्पर्धेत क्रिकेट आणि पिस्तुल नेमबाजीमध्ये सहभाग घेतला होता. दरम्यान, पिस्तुल शुटींगमध्ये त्यांनी रौप्यपदक प्राप्त केले. राज्याचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांना पदक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Web Title: State Police Sports Competition: Nashik Police Commissioner Dr. Silver for Ravindra Kumar Singhal