नाशिक : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात, वीस हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग

By Sandeep.bhalerao | Updated: March 16, 2023 12:36 IST2023-03-16T12:35:42+5:302023-03-16T12:36:05+5:30

सुरुवातीला मोर्चाला परवानगी नसल्याने दोन तास उशिराने मोर्चाला सुरुवात झाली. 

State government employees march begins participation of twenty thousand employees nashik | नाशिक : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात, वीस हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग

नाशिक : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात, वीस हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग

नाशिक : एकच मिशन जुनी पेन्शन, अशी घोषणाबाजी करीत नाशिक मधून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महामोर्चा निघाला. सुरुवातीला मोर्चाला परवानगी नसल्याने दोन तास उशिराने मोर्चाला सुरुवात झाली. 

जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जवळपास  वीस संघटनांनी मोर्चा सहभाग घेतला आहे. डोक्यावर पांढरी टोपी हातात बॅनर आणि एकच मिशन जुनी पेन्शन अशी तीव्र घोषणाबाजी करीत गोल्फ क्लब मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली.  

नियोजित वेळेनुसार सकाळी दहा वाजता मोर्चाला सुरुवात होणार होती. परंतु प्रशासनाने परवानगी नाकारल्याने हजारो कर्मचारी गोल क्लब मैदानावर बसून होते. मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर दुपारी बारा वाजता मोर्चाला परवानगी देण्यात आली.

Web Title: State government employees march begins participation of twenty thousand employees nashik