जंतनाशक मोहिमेस शिंदेगाव येथून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:46 IST2019-02-23T00:45:58+5:302019-02-23T00:46:25+5:30

जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीत २८ टक्के बालकांना जंताचा धोका असल्याचा निष्कर्ष काढल्याने देशभर ‘राष्टय जंंतनाशक मोहीम २००९’ राबविली जात असून, नाशिक जिल्ह्यातही शिंदेगाव येथे या मोहिमेस प्रारंभ झाला.

 Starting from Shindegaon, an insecticidal campaign | जंतनाशक मोहिमेस शिंदेगाव येथून प्रारंभ

जंतनाशक मोहिमेस शिंदेगाव येथून प्रारंभ

नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीत २८ टक्के बालकांना जंताचा धोका असल्याचा निष्कर्ष काढल्याने देशभर ‘राष्टय जंंतनाशक मोहीम २००९’ राबविली जात असून, नाशिक जिल्ह्यातही शिंदेगाव येथे या मोहिमेस प्रारंभ झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी बालकांना जंतनाशक गोळ्या देऊन मोहिमेला सुरुवात केली.
छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय येथे या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी सभापती यतिंद्र पगार, अर्पणा खोसकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, सदस्य शंकर धनवटे, पंचायत समिती सदस्य उज्ज्वला जाधव, संजय तुंगार, डॉ. मंगेश सोनवणे, विजय जगताप, शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय देकाटे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. दिनेश पाटील गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कैलास भोये आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे म्हणाल्या, सुदृढ आणि सशक्त पिढीसाठी सदर मोहित अत्यंत महत्त्वाची आहे. या मोहिमेचा लाभ सर्वघटकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी सभापती अर्पणा खोसकर, यतिंद्र पगार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, संजय  लाट, डॉ. रत्ना रावखंडे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी आरोग्य विभागातील सहा दिवसांनी निवृत्त होणाऱ्या आरोग्य सहायक वाघ यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन बडे यांनी केले. आभार शालिनी कदम यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदे येथील डॉ. पाटील, डॉ. वळवी, डॉ. दिघे, आरोग्य सहायक वडनेरे, तालुका सुपरवायझर पाटील, बडे, चाट कर यांनी विशेष प्रयत्न केले.


 

Web Title:  Starting from Shindegaon, an insecticidal campaign