रेल्वे बोगद्यावरील पुलासाठी अतिक्रमण काढण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:19 IST2019-07-20T23:21:03+5:302019-07-21T00:19:00+5:30
भगूर येथील रेल्वे बोगदापूल तयार करण्यासाठी अतिक्रमित टपऱ्या आणि मटणमार्केट काढण्यास भगूर नगरपालिका टाळाटाळ करीत असल्याने रेल्वेने पैसे परत देण्याचा इशारा दिला. त्यामुळे भगूर व्यापारी आणि भाजपा, मनसेसह विविध पक्षांनी भगूर कडकडीत बंद पाळत मुख्याधिकारी यांचा निषेध करताच पालिकेने रेल्वेला पत्र देऊन शनिवारी (दि.२०) येथील अतिक्र मित दोन टपºया काढण्यात आल्याने लवकरच बोगदा कामास सुरुवात होणार आहे.

भगूर येथे वादग्रस्त दुकानांचे अतिक्रमण हटवितांना नगरपालिकेचे कर्मचारी.
भगूर : येथील रेल्वे बोगदापूल तयार करण्यासाठी अतिक्रमित टपऱ्या आणि मटणमार्केट काढण्यास भगूर नगरपालिका टाळाटाळ करीत असल्याने रेल्वेने पैसे परत देण्याचा इशारा दिला. त्यामुळे भगूर व्यापारी आणि भाजपा, मनसेसह विविध पक्षांनी भगूर कडकडीत बंद पाळत मुख्याधिकारी यांचा निषेध करताच पालिकेने रेल्वेला पत्र देऊन शनिवारी (दि.२०) येथील अतिक्र मित दोन टपºया काढण्यात आल्याने लवकरच बोगदा कामास सुरुवात होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे प्रशासनाला भगूरचा रेल्वे बोगदा पूल तयार करण्यास दीड वर्षांपूर्वी पावणेचार कोटी रु पये दिले होते. बोगदा तयार करण्यास जवळील टपºया मटण मार्केट काढून देण्यास रेल्वेच्या प्रशासनाने पत्र देऊन प्रत्यक्ष पालिका मुख्याधिकारी यांना भेटून विनंती केली होती. परंतु पालिका मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांनी टाळाटाळ केली. यावेळी आम्ही शासनाचे पैसे परत करून बोगदा होणार नाही, असा रेल्वे अधिकारी यांनी राजकीय पक्ष आणि व्यापारी यांना संदेश देताच शिवसेना पक्ष सोडून व्यापारी आणि भाजपा-मनसे यांनी भगूर पालिकेला अतिक्र मण काढून बोगदा कामासाठी सहकार्य करण्याचे निवेदन दिले. प्रत्यक्ष भेट घेतली तरी मुख्याधिकारी यांनी सहकार्य केले नाही, त्यावर व्यापारी राजकीय पक्षांनी निषेध व्यक्त करत भगूर शहर कडकडीत बंद केले.
यावर जनतेच्या नाराजीनंतर अतिक्रमण काढण्याचे रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन टपºया काढून घेतल्या आणि रेल्वेला आता काम करण्यास जागा मोकळी करून दिली व जसे वाटेल तसे मटणमार्केट सोमवारपासून तोडून दिले जाईल. त्यामुळे लगेचच रेल्वे बोगदा कामास सुरु वात होऊन दोन महिन्यांत पूर्ण होणार असल्याने नागरिक व्यापारी राजकीय पक्षांनी भगूर नगरपालिकेचे आभार मानले, मात्र व्यापारी व जनतेने आंदोलनाचे अस्त्र दाखविल्याने अनेक वर्षांपासून टाळाटाळ होणारे काम लगेचच सुरू झाले.
बोगदा कामासाठी सहकार्याचे आवाहन
रेल्वे अधिकारी यांनी राजकीय पक्ष आणि व्यापारी यांना संदेश देताच शिवसेना पक्ष सोडून व्यापारी आणि भाजपा-मनसे यांनी भगूर पालिकेला अतिक्र मण काढून बोगदा कामासाठी सहकार्य करण्याचे निवेदन दिले. प्रत्यक्ष भेट घेतली तरी मुख्याधिकारी यांनी सहकार्य केले नाही, त्यावर व्यापारी राजकीय पक्षांनी निषेध व्यक्त करत भगूर शहर कडकडीत बंद केले होते.