खोपडी-मिरगाव पूरकालव्याचे काम तात्काळ सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 13:05 IST2020-08-21T13:04:47+5:302020-08-21T13:05:52+5:30

सिन्नर: तत्कालिन आघाडी शासनाच्या काळात सुमारे सात वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही काम सुरु होऊ न शकलेल्या खोपडी-मीरगाव पूरकालव्याचे थांबलेले काम तात्काळ सुरु करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व जलसंधारण अधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी वित्त विभागामार्फत ७२ कोटींहून अधिक निधी देण्यासही मंजुरी देण्यात आली.

Start work on Khopadi-Mirgaon floodplain immediately | खोपडी-मिरगाव पूरकालव्याचे काम तात्काळ सुरु करा

खोपडी-मिरगाव पूरकालव्याचे काम तात्काळ सुरु करा

ठळक मुद्देउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश मंत्रालयात बैठक, ७२ कोटींचा निधी मंजूर

सिन्नर: तत्कालिन आघाडी शासनाच्या काळात सुमारे सात वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही काम सुरु होऊ न शकलेल्या खोपडी-मीरगाव पूरकालव्याचे थांबलेले काम तात्काळ सुरु करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व जलसंधारण अधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी वित्त विभागामार्फत ७२ कोटींहून अधिक निधी देण्यासही मंजुरी देण्यात आली.
आमदार माणिकराव कोकाटे यांनी आघाडी शासनाच्या काळात सिन्नर तालुक्याच्या पूवर्भागातील अवर्षणग्रस्त भागासाठी हरित संजीवनी देण्याच्या उद्देशाने कुंदेवाडी ते सायाळे व खोपडी ते मिरगाव या दोन पूरकालव्यांना प्रशासकीय मंजुरी मिळवली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते भूमिपूजनही झाले होते.जलसंधारण मंत्री शंकरगडाख ,जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,वित्त विभागाचे सचिव राजू मित्तल, जलसंधारण विभागाचे सचिव नंदकुमार, औरंगाबाद जलसंधारण महामंडळाचे मुख्य अभियंता विश्वनाथन यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी सुमारे ३६ कोटीची ही योजना सुमारे ७२ कोटींहून अधिक रुपयांना जाईल असे जलसंधारण विभागाच्या अधिका?र्यांनी सांगताच त्यास तात्काळ सुधारित आर्थिक मंजुरी पवार यांनी दिली.यावेळी हिवरे व चोंढी येथील कोटा बंधा?र्यांचे कार्यारंभ आदेश तात्काळ देण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.
------------------------
टाकेद गटातील उपसा सिंचन योजना सुरु होणार..
दहावर्षांपासून टाकेद गटात आदिवासी भागात मंजुरी मिळालेल्या उपसा सिंचन योजना सुरु होऊ शकलेल्या नाही. मात्र या भागाची आदिवासी लोकसंख्या 90 टक्के नसल्याने अडथळे येत असल्याचा मुद्दा आमदार कोकाटे यांनी मांडून बाळभैरवनाथ सारख्या उपसा सिंचन योजना एनजीओ मार्फत चालविण्यास परवानगी देण्याची मागणी केली.त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी विशेष बाब म्हणून आदिवासी लोकसंख्येची अट शिथिल करत ना नफा ना तोटा तत्वावर टाकेद गटातील उपसा सिंचन योजना एनजीओ मार्फत चालविण्यास परवानगी दिली.त्यामुळे टाकेद गटातील उपसा जलसिंचन योजनाही लवकरच सुरु होणार आहेत. शिवाय हा भाग आदिवासी असल्याने केंद्रसरकारकडून आदिवासी भागासाठी मिळणारा निधी अंतर्गतचीहि जास्तीत जास्त कामे या भागात मंजूर होतील याकडे लक्ष देण्याच्या सूचना पवार यांनी अधिका?र्यांना दिल्या.

Web Title: Start work on Khopadi-Mirgaon floodplain immediately

टॅग्स :Nashikनाशिक