रायफल शुटींग स्पर्धेला प्रारंभ
By Admin | Updated: October 25, 2016 00:10 IST2016-10-25T00:10:35+5:302016-10-25T00:10:55+5:30
कळवण : दहा राज्यातील स्पर्धकांचा सहभाग

रायफल शुटींग स्पर्धेला प्रारंभ
कळवण : गुरुदत्त शिक्षण संस्था संचलित मानूर येथील शरद पवार पब्लिक स्कूल येथे सोमवारपासून
(दि. २४) सीबीएसई बोर्डाच्या साऊथ झोन रायफल व पिस्तूल शुटींग स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कविता राऊत यांचे प्रशिक्षक, स्पोर्ट अॅथोरिटी आॅफ इंडिया, प्रशिक्षक विजेंद्रसिंग, एशियन अॅथलेटिक्स सुवर्णपदक विजेती दुर्गा देवरे, पोलीस निरीक्षक सुजय घाडगे, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष विलास शिरोरे, उद्योजक मुशीर शेख उपस्थित होते. विजेंद्र सिंग व दुर्गा देवरे यांनी ध्वज उभारून व क्र ीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे. डी. पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असल्याचे सांगितले. यावेळी शरद पवार पब्लिक स्कूलचे अध्यक्ष शैलेश पवार, सचिव अनुप पवार, सप्तशृंगी महिला बँकेच्या अध्यक्ष मीनाक्षी पवार, डॉ. जयवंत पवार, विलास शिरोरे, गजानन सोनजे, प्राचार्य बी. एन. शिंदे, जे. एल. पटेल, अविनाश मारू, श्रावण अहेर, विश्वेस्वरन आदिंसह गुरुदत्त स्पोर्ट क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)