शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

चांगले, सोनवणे हत्त्येच्या नियमित सुनावणीस सुरुवात

By admin | Updated: August 5, 2014 01:56 IST

चांगले, सोनवणे हत्त्येच्या नियमित सुनावणीस सुरुवात

 

नाशिक : सराईत गुन्हेगार मोहन चांगले आणि दीपक सोनवणे ऊर्फ सफ ऱ्या या दोघांच्या हत्त्येला सव्वा वर्षाचा कालावधी उलटला असून, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जे़ सी़ शिरसाळे यांच्या न्यायालयात सोमवारपासून या खटल्याच्या नियमित सुनावणीस सुरुवात झाली आहे़ सोमवारी घटनास्थळाचे पुरावे, मृतांचा पंचनामा, गुन्ह्यात वापरलेली गाडी या बाबी न्यायालयासमोर सादर करण्यात आल्या़ दरम्यान, या खटल्यातील चारही संशयित न्यायालयीन कोठडीत असून, एक जामिनावर आहे़ ७ मे २०१३ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास सराईत गुन्हेगार मोहन चांगले आणि दीपक सोनवणे हे दोघे गंगापूररोडवरील नवश्या गणपतीजवळील हॉटेल विसावा येथे जेवणासाठी गेले़ या ठिकाणी या दोघांवर धारदार हत्त्याराने वार करण्यात आले होते़ या दोघांना उपचारासाठी गंगापूररोडवरील सुमन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी रामदास चांगले याने गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फि र्यादीवरून राजेंद्र वाघ, व्यंकटेश मोरे, अर्जुन पगारे, गिरीश शेट्टी, राकेश कोष्टी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दुहेरी हत्त्याकांडाला सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून, गंगापूर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे़ या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जे़ सी़ शिरसाळे यांच्या न्यायालयात सोमवारपासून सुरू झाली आहे़ (प्रतिनिधी)