गोदाकाठ भागात ऊसतोडणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:42 IST2019-12-01T00:41:22+5:302019-12-01T00:42:28+5:30
चांदोरी : निफाड तालुक्यातील संपूर्ण गोदाकाठ परिसरात ऊसतोडणीस प्रारंभ झाला असून, हजारो ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत. दरम्यान, निफाड व रानवड सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने ऊस उत्पादकांना कादवा, पिंपळगाव निपाणी येथील गोदा कादवा, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संजीवनी, अगस्ती व कोळपेवाडी येथील कारखान्यांना ऊस द्यावा लागतो. यंदाही जिल्ह्यातील उसासाठी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रयत्न चालविले आहेत.

गोदाकाठ भागात ऊसतोडणीस प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदोरी : निफाड तालुक्यातील संपूर्ण गोदाकाठ परिसरात ऊसतोडणीस प्रारंभ झाला असून, हजारो ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत.
दरम्यान, निफाड व रानवड सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने ऊस उत्पादकांना कादवा, पिंपळगाव निपाणी येथील गोदा कादवा, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संजीवनी, अगस्ती व कोळपेवाडी येथील कारखान्यांना ऊस द्यावा लागतो. यंदाही जिल्ह्यातील उसासाठी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रयत्न चालविले आहेत.
निफाड तालुक्यातील चांदोरी येथे अनेक उसाचे खासगी व्यापारी असून, त्यांच्यामार्फत गुजरात, दिल्ली, राजस्थान येथे रसवंतीकरिता तसेच चांदोरी व पिंपळस येथील गूळ उद्योगास ऊस पाठविला जातो. त्यामुळे तालुक्यातील गोदाकाठ भागात उसाची व्यापारीपेठ निर्माण झाली आहे.
यंदाच्या गळीत हंगामासाठी गोदाकाठ भागात ऊसतोडणीस प्रारंभ झाला आहे. तसेच जिल्ह्यात व नगर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पोहोचविण्यासाठी चाळीसगाव, बीड, औरंगाबाद येथील ऊसतोडणी मजूर चांदोरी परिसरात दाखल झाले आहेत. साधारणत: सर्वच कारखान्याचे बॉयलर पेटले असून, दसरा झाल्यानंतर साखर कारखाने सुरू केले जातात. त्यानंतर अनेक महिने कारखान्यांचे गाळप सुरू असते. बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहाराचे गणित हे द्राक्ष व उसाच्या पिकांवर अवलंबून असते. त्यामुळे उसाला जास्त दर मिळण्याची अपेक्षा शेतकरीवर्ग करीत आहे. प्रामुख्याने, जादा दर देणाºया कारखान्यांना किंवा व्यापाऱ्यांना ऊस देण्याकडे शेतकºयांचा कल आहे, तर बाहेरील कारखान्यांनी गोदाकाठ परिसरातील ऊस सर्वात लवकर उचलण्याची घाई चालविली आहे. प्रामुखयाने नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गोदाकाठ भागातील ऊस मिळविण्यासाठी जादा दर देवून प्रयत्न चालविले आहे. खासगी कारखान्यांचे आव्हान
उसाला हमीभाव मिळत असल्याने बव्हंशी शेतकरी ऊस लागवडीला प्राधान्य देतात. पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असल्याने त्याचा लागवडीवर परिणाम होत आहे. ऊस नैसर्गिक आपत्तीला बळी पडत नाही, असा समज आहे. गारपीट किंवा तत्सम काही घटना घडली तरी उसाचे फार नुकसान होत नाही, असे शेतकºयांना वाटते. साखर कारखानदारीत दर देण्याची स्पर्धा वाढली आहे. त्यात खासगी कारखान्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.