बाजार समितीत कांदा लिलाव तात्काळ सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 18:26 IST2020-10-26T18:25:11+5:302020-10-26T18:26:05+5:30
देवळा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव तात्काळ सुरू करण्यात यावा या मागणीचे निवेदन राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने बाजार समिती सचिव यांना देण्यात आले.

देवळा येथील बाजार समिती सचिव माणिक निकम यांना निवेदन देतांना कृष्णा जाधव, जयदीप भदाणे, शिवाजी पवार आदी.
देवळा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव तात्काळ सुरू करण्यात यावा या मागणीचे निवेदन राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने बाजार समिती सचिव यांना देण्यात आले.
केंद्र सरकारने कांद्याच्या घाऊक व्यापारासाठी २५ टन व किरकोळ साठी २ टन साठ्याची मर्यादा घालून दिल्याने बाजार समित्यांनी व्यापारी अर्जानुसार लिलावाचे कामकाज बंद ठेवले आहे परंतु सध्या दिवाळीचा सण तोंडावर आल्याने आणि शेतीच्या नवीन हंगाम उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना भांडवलाची गरज असतांना तसेच चाळींमधला कांद्याचे सडण्याचे प्रमाण वाढत असल्याने बेमुदत बाजार समित्यांचे कामकाज बंद राहिल्यास जेव्हा बाजार समित्यांचे कामकाज सुरू होईल तेव्हा कांद्याची एकदम आवक होऊन कांद्याच्या बाजार भावात मोठी घसरण होऊन शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होईल
कांदा उत्पादकांचे हे नुकसान टाळण्यासाठी २७ ऑक्टोबर पासून तात्काळ बाजार समितीत व उपबाजार समितीत कांदा लिलाव सुरू करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर प्रदेश संघटक कृष्णा जाधव, जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, युवा तालुकाध्यक्ष किरण सोनवणे, भगवान जाधव, बापू देवरे, भाऊसाहेब मोरे, दशरथ पुरकर आदींच्या सह्या आहेत.