वसाकाच्या संरक्षक भिंतीचे भगदाड बुजविण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:56 IST2020-07-18T21:01:38+5:302020-07-19T00:56:39+5:30
लोहोणेर : ‘वसाकाची सुरक्षा रामभरोसे’ या मथळ्याखाली शनिवारी (दि.१८) लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत वसाका प्रशासनाने दखल घेत सुमारे १७०० मीटर लांबी व सुमारे १० फूट उंची असलेल्या दगडी भिंतीला काटेरी झाडी लावून जागोजागी पडलेले भगदाड बुजविण्याच्या कामास सुरूवात केली आहे.

वसाकाच्या संरक्षक भिंतीचे भगदाड बुजविण्यास प्रारंभ
लोहोणेर : ‘वसाकाची सुरक्षा रामभरोसे’ या मथळ्याखाली शनिवारी (दि.१८) लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत वसाका प्रशासनाने दखल घेत सुमारे १७०० मीटर लांबी व सुमारे १० फूट उंची असलेल्या दगडी भिंतीला काटेरी झाडी लावून जागोजागी पडलेले भगदाड बुजविण्याच्या कामास सुरूवात केली आहे.
वसाकाच्या संरक्षण भिंतीला जागोजागी मोठमोठे भगदाड पडल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
या वृत्तामुळे वसाकाच्या प्रशासनाला खडबडून जाग येत वसाकाच्या भाडेकरू संस्था असलेल्या धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या आदेशानुसार प्रशासनाने दखल घेऊन जेसीबी च्या साह्याने सदर संरक्षण भिंती लगत जमलेली दगड बाजूला करून या ठिकाणी काटेरी कुंपन उभे करण्यास सुरूवात केली. त्यामुळे वसाकाच्या सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.