शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जाता जाता ‘खुर्च्या’ बदलण्यास प्रारंभ

By admin | Updated: February 25, 2017 23:33 IST

कालिदासचे नाट्य : ‘मनसे’ काम सुरू

नाशिक : ऐन निवडणुकीत राजकीय रंगमचावर ‘कालिदास’चे नाट्य गाजल्यानंतर मनसेच्या सत्ताधिकाऱ्यांनी जाता जाता खुर्च्या बदलण्यास सुरुवात केली आहे. अर्थात, या सर्व प्रकारात मनसेला आपली खुर्ची मात्र वाचविता आली नाही, हे विशेष !महापालिकेच्या निवडणुकीत मनसेच्या कामकाजावर शेरेबाजी होत असताना जाता जाता वनौषधी उद्यान, वॉटर कर्टन तसेच शस्त्र संग्रहालय अशा उपक्रमांचे उद््घाटन राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर मुंबईच्या कलावंतांना नाशिकमध्ये मनसेने केलेली कामे दाखविली जात होती. त्यातच नेमके नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी कालिदास कलामंदिराच्या दुरवस्थेला तोंड फोडले. कालिदास कलामंदिरातील तुटक्या खुर्च्या आणि आणि अस्वच्छतेचे अनेक फोटो दामले यांनी व्हायरल केल्यानंतर राजकीय रंगमंचावरच नाट्य गाजू लागले. कलावंतांना नाशिकमधील कामे दाखविणाऱ्या राज ठाकरे यांनी कलावंताची मूलभूत समस्या असलेल्या महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराकडे कितपत लक्ष दिले अशा आशयाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे मनसेच्या चित्रपट सेनेने उलट दामले यांनाच राजकीय स्वरूपात रंगविण्यात सुरुवात केली. राजकीय वाद निर्माण झाल्याने मुळात कलावंत असलेल्या दामले यांनी त्यापासून दूर राहणे पसंत केले. परंतु मनसेला मात्र ही बाब खूपच खटकली. कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव आणि निवडणुकीनंतर होणारी कामे हे आयुक्तांमार्फत जाहीर करण्यात आले. परंतु तोपर्यंत वेळ गेली होती. सत्तापटलावर मनसेची खुर्ची गेली, परंतु जाता जाता त्यांनी कालिदासच्या खुर्च्या दुरुस्तीला प्रारंभ केला आहे. सध्या कलामंदिरात हे काम जोमाने सुरू आहे. आता लवकरच नूतनीकरणाच्या निविदा काढल्या जाणार आहे.