शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

सेंट्रल किचनची स्थायीकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:00 AM

सेंट्रल किचनच्या ठेक्यातील अनेक बाबी नियमबाह्य असल्याचे महासभेत आरोप झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी पथके नेमून गेल्या आठवड्यात तेराही सेंट्रल किचनला अचानक भेटी दिल्या. त्यानंतर सोमवारी (दि.१३) स्थायी समितीने नियुक्त केलेल्या चौकशी समितीनेदेखील भल्या सकाळी अशा प्रकारे भेटी दिल्या. यात अनेक गैरप्रकार आढळल्याचे सांगितले जात असून, समितीतच हा सर्व अहवाल सादर केला जाणार आहे.

ठळक मुद्देदणका : अनेक नियमबाह्य प्रकार आढळल्याची चर्चा

नाशिक : सेंट्रल किचनच्या ठेक्यातील अनेक बाबी नियमबाह्य असल्याचे महासभेत आरोप झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी पथके नेमून गेल्या आठवड्यात तेराही सेंट्रल किचनला अचानक भेटी दिल्या. त्यानंतर सोमवारी (दि.१३) स्थायी समितीने नियुक्त केलेल्या चौकशी समितीनेदेखील भल्या सकाळी अशा प्रकारे भेटी दिल्या. यात अनेक गैरप्रकार आढळल्याचे सांगितले जात असून, समितीतच हा सर्व अहवाल सादर केला जाणार आहे.स्थायी समितीने पोषण आहारातील घोटाळ्यांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे. या समितीत दिनकर पाटील, संतोष साळवे, स्वाती भामरे, सुषमा पगारे यांच्या बरोबरच शिक्षणाधिकारी देवीदास महाजनदेखील आहेत. रविवारी (दि.१२) रात्री या समितीने पाहणी करण्याचे ठरविल्यानंतर सकाळी सहा वाजता ‘रामायण’ येथे सर्व सदस्य जमले आणि त्यानंतर त्यांनी एका ठेकेदारच्या किचनला भेट दिली. त्याचप्रमाणे एका शाळेलादेखील भेट दिली आणि तेथील अवस्था बघितली. यात अनेक प्रकारची अनियमितता आढळल्याचे समजते. येत्या स्थायी समितीत यासंदर्भात अहवाल सादर केला जाणार आहे.शहरातील मनपा आणि अन्य खासगी शाळांतील सव्वा लाख विद्यार्थ्यांना सेंट्रल किचन अंतर्गत मध्यान्ह भोजन देण्यात येत आहे. महापालिकेने ही प्रक्रिया योजना राबविण्यासाठी तेरा ठेके दिले आहेत. सदरचे ठेके देताना मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप असून महासभेत यासंदर्भात नगरसेवकांची ठेकेदारावर प्रशासनाने कशाप्रकारे मेहरबानी केली त्याची चिरफाड केली होती.सर्वोच्च न्यायालयाने छोट्या छोट्या म्हणजे अगदी एका शाळेसाठी एका पुरवठादार पुरवण्याचे निर्देश दिले असताना उलट आर्थिक उलाढालीचा निकष वाढवून काही संस्था बाद कशा करता येईल याची काळजी घेण्यात आली. निविदेत अनेक प्रकारच्या अटी पात्र करत नसतानादेखील ठेके देण्यात आले. त्याचप्रमाणे निविदा दिल्यानंतर नियमभंग होत होता.भेटीचे केले मोबाइलवर चित्रीकरणगेल्या आठवड्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्याने ठेकेदार निश्चिंत होते. मात्र, त्यानंतर सोमवारी (दि.१३) नगरसेवकांनी अचानक भेटी दिल्या. सकाळी रामायण येथे सर्व सदस्य जमल्यानंतर एका सेंट्रल किचनला भेट देण्याचे ठरविण्यात आले. मात्र, त्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली. त्याचबरोबर सर्वजण एकाच मोटारीत बसून गेले. किचन आणि शाळेत भेट दिल्यानंतर मोबाइल फोन एकाच ठिकाणी ठेवण्यात आले असले तरी सर्व भेटीचे एका मोबाइलमध्ये चित्रीकरण ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :foodअन्न