शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

एक हजार रूपयांच्या दंड आकारणीस स्थायी समितीचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 10:54 PM

नाशिक : शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढु लागल्याने वारंवार सांगूनही आरोग्य नियमांचे पालन न करणाऱ्या नागरीकांना धडा शिकवण्यासाठी महापालिकेने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार आता एक हजार रूपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यास महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षानेच विरोध केला असून त्यानुसार दर आकारणीस विरोध केला आहे.

ठळक मुद्देअजब प्रकार: पूर्वी प्रमाणेच आकारणीचे प्रशासनाला आदेश

नाशिक : शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढु लागल्याने वारंवार सांगूनही आरोग्य नियमांचे पालन न करणाऱ्या नागरीकांना धडा शिकवण्यासाठी महापालिकेने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार आता एक हजार रूपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यास महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षानेच विरोध केला असून त्यानुसार दर आकारणीस विरोध केला आहे. मुंबई पुण्याच्या तुलनेत नाशिकलाच दंडाची रक्कम जास्त का असा सवाल स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (दि.२३) करण्यात आला आणि सभापती गणेश गिते यांनी देखील त्यानुसार प्रशासनाला दंड कमी करण्याचे आदेश दिले आहेत.कोरोनाचे जीवघेणे संकट पुन्हा घोंघावत असताना स्थायी समितीच्या या आदेशामुळे प्रशासन देखील गोंधळात पडले असून ऐकावे तरी कोणाचे अशी स्थिती निर्माण झाली आहे.गेल्या रविवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मास्क न लावणाऱ्या आणि थुंकीबहाद्दरांकडून दोनशे ऐवजी पाचशे रूपये दंड आकारा अस आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी त्यानुसार कार्यवाही सुरू केली असून मंगळवारपासूनच (दि.२३) त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, मुंबई आणि पुण्यात शंभर ते दोनशे रूपये दंड असताना नाशिकमध्येच एक हजार रूपयांचा दंड का असा प्रश्न काँग्रेस पक्षाचे राहूल दिवे यांनी केला. सध्या आर्थिक संकटामुळे नागरीक मेटाकुटीस आले आहेत, अशावेळी दंड वाढवून भुर्दंड देऊ नका असा प्रश्न त्यांनी केला तर अन्य भाजप नगरसेवकांनी त्यांना समर्थन दिल्याने सभापती गणेश गिते यांनी दंडाची रक्कम कमी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.कोरोनाशी लढण्यासाठी महापालिकेने सहाही विभागात एकेक या प्रमाणे सर्वच विभागात आरटीपीसीआर चाचण्यांची मोफत सोय केली आहे, अशी यावेळी माहिती सभापती गणेश गिते यांनी दिली तर सातपूर आणि सिडको येथील नागरीकांना कोरोना चाचण्या करण्यासाठी जुन्या नाशकात डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात पाठवले जाते. त्यामुळे गंगापूर रूग्णालयात चाचण्यांची सोय करण्याची मागणी प्रा. वर्षा भालेराव यांनी केली.इन्फो...अग्निशमनच्या वेतनश्रेणीचा प्रश्नसातवा वेतन आयोगासाठी वेतननिश्चीती करताना अग्निशमन दलावर अन्याय करण्यात आल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी या बैठकीत केला. मनपाच्या फायरमन आणि लिडींग फायरमन या पदांसाठी स्थायी समितीने वेतनग्रेड २४०० व २८८० रुपये अशी वेतनश्रेणी नमूद केली होती. मात्र, प्रशासनाने वेतन ग्रेड १९०० व २००० असे प्रस्तावित करून शासनाला पाठवले आहे. त्यावर जाब विचारल्यावर शासनाच्या नियमानुसार १९०० व २००० रुपये वेतन निश्चिती केल्याचे प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे बडगुजर यांनी घोडे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. अखेरीस अतिरीक्त आयुक्त प्रविण आष्टीकर यांनी मध्यस्थी करीत पुन्हा समिक्षा करण्यात येईल असे सांगून वाद मिटवला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या