पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:46 IST2018-11-12T00:46:04+5:302018-11-12T00:46:21+5:30
जेलरोड, कॅनॉलरोड आम्रपाली झोपडपट्टीत विवाहितेचा विनयभंग करून शिवीगाळ करत दहशत माजवल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेप्रसंगी पोलीस घटनास्थळी पोहोचले असता संशयिताने पोलिसांच्या गाडीवर दगड फेकून गोंधळ घातला.

पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून गोंधळ
नाशिकरोड : जेलरोड, कॅनॉलरोड आम्रपाली झोपडपट्टीत विवाहितेचा विनयभंग करून शिवीगाळ करत दहशत माजवल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेप्रसंगी पोलीस घटनास्थळी पोहोचले असता संशयिताने पोलिसांच्या गाडीवर दगड फेकून गोंधळ घातला.
जेलरोड कॅनॉलरोड येथील झोपडपट्टीत भांडणाची कुरापत काढून संशयित दत्ता लक्ष्मण हिरोडे (वय २४) याने विवाहितेशी गैरवर्तन करून शिवीगाळ केली. तसेच घरातून चाकू आणून विवाहितेचे दीर अनिल यास धाक दाखवत धावून गेला म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्रपाली झोपडपट्टीत सुरू असलेल्या वादविवादाची माहिती उपनगर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असता संशयित दत्ता हिरोडे याने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करून दहशत माजवली.