शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

एसटी कामगार संघटना आंदोलनाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 1:35 AM

वेतनकरारासह कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांकडे महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी मागीलवर्षी ऐन दिवाळीत चार दिवसांचा संप करणाऱ्या एसटी कामगार संघटनेने यंदाच्या दिवाळीतही प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा तयारी केली असून, ३० आॅक्टोबरला आझाद मैदानापासून उपोषणाला सुरुवात होऊन १ नोव्हेंबरपासून राज्यातील विभागीय कार्यालयांसमोर उपोषणाला सुरुवात होणार आहे.

नाशिक : वेतनकरारासह कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांकडे महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी मागीलवर्षी ऐन दिवाळीत चार दिवसांचा संप करणाऱ्या एसटी कामगार संघटनेने यंदाच्या दिवाळीतही प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा तयारी केली असून, ३० आॅक्टोबरला आझाद मैदानापासून उपोषणाला सुरुवात होऊन १ नोव्हेंबरपासून राज्यातील विभागीय कार्यालयांसमोर उपोषणाला सुरुवात होणार आहे. ऐन दिवसाळीतील संपामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता असल्यामुळे महामंडळ उपोषणावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  मान्यताप्राप्त संघटनेने कर्मचाºयांच्या हितासाठी वारंवार अनेक प्रश्न मांडले आहेत, परंतु महामंडळाकडून प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने तसेच वेतनकरारावर अद्यापही तळ्यात-मळ्यात सुरू असल्यामुळे महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी या दिवाळीत संघटनेने पुन्हा आंदोलनाची हाक दिलेली आहे. सन २०१६-१७ या कालावधीच्या वेतन करारासाठी एकतर्फी वेतनवाढ जाहीर करण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. वेतनवाढ जाहीर करण्यात आली असली तरी चार वर्षांच्या वेतनवाढीसाठी जाहीर केलेले ४८४९ कोटींचे पॅकेज संघटनेने मान्य केलेले आहे. परंतु प्रशासनाने सदर पॅकेच वाटपाचे सूत्र वापरलेले आहे त्या सूत्रामुळे ४,८४९ कोटींमधील सुमारे १,५०० कोटी इतकी रक्कम शिल्लक राहत असल्यामुळे सदर रकमेचे कामगारांना वाटप होणे अपेक्षित असल्याची भूमिका संघटनेने घेतलेली आहे.वेतनकरारातील अनेक मुद्द्यांवर कामगार संघटनेने अद्यापही स्वाक्षरी केलेली नसून प्रशासन लवचिक भूमिका घेण्यास तयार नसल्यामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोष असल्याचा दावा संघटनेने केला आहे. प्रशासननाच्या या भूमिकेमुळे कामगारांमध्ये नाराजी आहे. कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास ३० आॅक्टोबरपासून आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असे संघटनेने कळविले आहे.  संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी २२ विविध प्रकारच्या मागण्या मांडलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने एकतर्फी करण्यात आलेली वेतनवाढ कोंडी दूर करावी, कामबंद आंदोलनात सहभागी कर्मचाºयांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, खासगीकरणातून घेण्यात आलेल्या शिवशाही बसेस महामंडळानेच चालवाव्यात, महामंडळात विविध सेवांचे कंत्राटीकरण सुरू झाल्याने कर्मचाºयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. या कर्मचाºयांना दिलासा देण्यासाठी कंत्राटी कामाची पद्धत बंद करण्यात यावी, मयत आणि अपंगत्व आलेल्या कर्मचाºयांच्या वारसांना सुविधा तसेच नोकरी देण्याबाबतची तरतूद असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या मागण्यांप्रमाणेच अन्य अनेक महत्त्वाच्या मागण्या संघटनेने केलेल्या आहेत.वेतनकरार हेच मुख्य कारणकामगार संघटनेने विविध प्रकारांच्या २२ अडचणी आणि प्रश्नांबाबत उपोेषणाची हाक दिलेली असली तरी प्रत्यक्षात मात्र वेतनकरार हा विषय पुन्हा यानिमित्ताने संघटनेने समोर आणला आहे. संघटनेकडून या कराराबाबत घेण्यात आलेली भूमिका सावध असल्याचे गेल्या काही बैठकांमध्ये दिसून आलेली आहे. आक्रमकपणे हा मुद्दा व्यासपीठावरून अनेकदा मांडण्यात आलेला आहे. परंतु मधल्या काळात काय चर्चा होते याबाबतची माहिती मिळतही नाही. आता पुन्हा दिवाळीचा मुहूर्त साधून कामगारांनी उपोेषणाचा इशारा दिलेला आहे. याच प्रश्नावर कामबंद आंदोलन, असहकार तसेच विभागीय कार्यशाळांमध्ये होणाºया हाणामाºयापर्यंत प्रकरण गेल्याने ही बाब आता अत्यंत असंवेदनशील बनली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळdiwaliदिवाळी