शिवसाई गॅस एजन्सीत चोरी सायखेडा : लाखो रुपयांचे नुकसान; कार्यालयाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:16 IST2018-04-04T00:16:17+5:302018-04-04T00:16:17+5:30

सायखेडा : येथील शिवसाई गॅस एजन्सीच्या आॅफिसचे शटर तोडून चोरत्यांनी सुमारे ५५ हजार रूपयांचे साहित्य चोरून नेत, आॅफिसची तोड फोड सोमवारी पहाटेच्या सुमारास केल्याने एजन्सीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

Sreedharan gas agency stolen cash: loss of millions of rupees; Office break | शिवसाई गॅस एजन्सीत चोरी सायखेडा : लाखो रुपयांचे नुकसान; कार्यालयाची तोडफोड

शिवसाई गॅस एजन्सीत चोरी सायखेडा : लाखो रुपयांचे नुकसान; कार्यालयाची तोडफोड

ठळक मुद्देगुदाम व कार्यालयास कुलुप लावले होतेगोदामाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाला

सायखेडा : येथील शिवसाई गॅस एजन्सीच्या आॅफिसचे शटर तोडून चोरत्यांनी सुमारे ५५ हजार रूपयांचे साहित्य चोरून नेत, आॅफिसची तोड फोड सोमवारी पहाटेच्या सुमारास केल्याने एजन्सीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सायखेडा सोनगाव रोड वर सायखेडा येथील राकेश ठाकुर यांची शिवसाई गॅस एजन्सी असुन याठिकाणी एजन्सी चे कार्यालय व गुदाम आहे. कर्मचार्यांनी शनिवारी सायंकाळी गुदाम व कार्यालयास कुलुप लावले होते. रविवारी देखील ते सुस्थितीत आढळून आले. परंतु सोमवारी सकाळी 9वाजेच्या सुमारास एजन्सी च्या कार्यालयाचे कुलूप एजन्सी चे संचालक राकेश ठाकुर यांना तुटलेले आढळुन आले. तर गोदामाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाला मात्र यात अपयश आल्याने चोरत्यांच्या हाती आॅफिसमधील 28 शेगड्या, 3 कुकर, 8 तवे, कंप्यूटर इत्यादी साहित्यच लागले. यापुर्वी 2016 मध्ये मार्च मिहन्यात याच ठिकाणी झालेल्या चोरीत 43 गैस सिलेंडर, शेगड्या, कंप्यूटर, प्रिंटर, कुकर, तवे, रोकड, रेग्युलेटर इत्यादी साहित्य लंपस करत लाखो रूपयांची चोरी झाली होती, पुन्हा याच ठिकाणी चोरी होत, हजारो रूपयांचा माल लंपास केला आहे.
याप्रकरणी ठाकुर यांनी सायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस अधिक तपास करत आहे.

Web Title: Sreedharan gas agency stolen cash: loss of millions of rupees; Office break

टॅग्स :Crimeगुन्हा