मळगाव शाळेची वर्गखोली कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:37 IST2018-08-13T22:35:53+5:302018-08-13T22:37:16+5:30
मालेगाव तालुक्यातील मळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीतील धोकेदायक व निर्लेखित करण्यात आलेली वर्गखोली कोसळली. शिक्षकांनी प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना गेल्या काही दिवसांपासून पर्यायी जागेवर स्थलांतरित केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

मळगाव शाळेची वर्गखोली कोसळली
मळगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत १७० विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेच्या जुन्या इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे. वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. यापूर्वीच शाळेची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.