मुंजवाड ग्रामपंचायतीतर्फे जंतुनाशक औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 22:41 IST2020-04-07T22:41:22+5:302020-04-07T22:41:43+5:30

महाराराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात तीन वेळा रोग नियंत्रक फवारणी करून गावात संचारबंदीचे पालन शंभर टक्के करण्यात येत आहे.

Spraying pesticide by Munjawad Gram Panchayat | मुंजवाड ग्रामपंचायतीतर्फे जंतुनाशक औषध फवारणी

मुंजवाड येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात औषध फवारणी करताना उपसरपंच संजय जाधव व ग्रामपंचायत सदस्य महेंद्र जाधव.

मुंजवाड : महाराराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात तीन वेळा रोग नियंत्रक फवारणी करून गावात संचारबंदीचे पालन शंभर टक्के करण्यात येत आहे.
आमदार दिलीप बोरसे यांनी गावाला सॅनिटायझ करण्यासाठी मोफत औषधाचा पुरवठा केल्याने संपूर्ण गावात औषधाची फवारणी करण्यात आली. यापूर्वी दोन वेळा ग्रामपंचायतीने स्वखर्चातून औषध फवारणी केली असून, ग्रामस्थांना घरातच रहाण्याचे आवाहन सरपंच प्रमिला पवार, उपसरपंच संजय जाधव आणि पोलीसपाटील दीपक सूर्यवंशी आदी करीत आहेत.
गावातील किराणा दुकान सकाळी दोन व सायंकाळी दोन तास उघडत असत, मात्र काही दुकानदार नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसताच पोलिसांना सांगून त्यांना समज देण्यात आली. त्या नंतर ग्रामपंचायतीने निर्णय घेऊन गर्दी टाळण्यासाठी सकाळी ७ ते १० या वेळेत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी किरणा दुकान उघडण्यात येत आहेत. तसेच गावात वेळोवेळी दवंडी देऊन शासनाच्या आदेशांची माहिती ग्रामस्थांना देण्यात येत आहे. पुणे-मुंबईहून आलेल्या नागरिकांना घराबाहेर पडू नये यासाठी सूचना देण्यात येत आहेत. भाजीपाला गावातच विक्री करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण होत नाही.

Web Title: Spraying pesticide by Munjawad Gram Panchayat