दत्तू भोकनळने केली स्वखर्चाने फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 23:35 IST2020-04-13T23:34:59+5:302020-04-13T23:35:15+5:30

चांदवड येथे कोरोनाचा विषाणूचा रुग्ण आढळून आल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक जागृत झाले आहेत. आॅलिंपिक रद्द झाल्यामुळे भारतीय रोइंग खेळाडू दत्तू भोकनळ सध्या आपल्या मूळ गावी चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे आले आहेत. एक सामाजिक बांधिलकी म्हणून दत्तू भोकनळ यांनी स्वखर्चाने गावात ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना, मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी औषध फवारणी केली.

Spraying by Dattu Bhopal for self-consumption | दत्तू भोकनळने केली स्वखर्चाने फवारणी

दत्तू भोकनळने केली स्वखर्चाने फवारणी

ठळक मुद्देतळेगाव रोही : आश्रमातील मुलांना अन्नधान्यासह किराणाची मदत

दरेगाव : चांदवड येथे कोरोनाचा विषाणूचा रुग्ण आढळून आल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक जागृत झाले आहेत. आॅलिंपिक रद्द झाल्यामुळे भारतीय रोइंग खेळाडू दत्तू भोकनळ सध्या आपल्या मूळ गावी चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे आले आहेत. एक सामाजिक बांधिलकी म्हणून दत्तू भोकनळ यांनी स्वखर्चाने गावात ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना, मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी औषध फवारणी केली.
संपूर्ण गावाने संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करून गावातील ग्रामस्थांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये, तसेच गावातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोरोनाला हरवण्यासाठी कंबर कसली आहे कोरोनाची लागण झालेल्या रु ग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि त्यांना लागणारे साहित्य हे खेड्यापाड्यापर्यंत वेळेत पोहोचेल हे सांगता येत नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ नये व आपण आहे त्या स्थितीत व्यवस्थित राहावे यामुळे दत्तू भोकनळ यांनी लासलगाव येथील शास्त्रीनगर पिंपळगाव (नजीक) येथील जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रमातील मुलांना बिस्किट, किराणा सामनही दिले. याप्रसंगी बाळासाहेब भोकनळ, युवराज भोकनळ, भागवत झाल्टे हे उपस्थित होते.
तळेगावरोही गावकऱ्यांमध्ये जनजागृती केली तर गावातील नागरिकांनी एकत्र येण्याचे टाळावे व आपल्या घरात रहा, सुरक्षित रहा, कोरोनासोबतच इतर कोणतीही रोगराई गावात फिरकू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही दत्तु भोकनळ यांनी केले.

Web Title: Spraying by Dattu Bhopal for self-consumption