उमराणे रु ग्णालयात फवारणी गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 23:19 IST2020-04-19T23:19:01+5:302020-04-19T23:19:20+5:30
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी येथील जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने ग्रामीण रु ग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर फवारणी गेट बसविण्यात आला आहे.

उमराणे ग्रामीण रु ग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ साकारलेले सॅनिटायझर फवारणी गेट.
उमराणे : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी येथील जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने ग्रामीण
रु ग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर फवारणी गेट बसविण्यात आला आहे.
कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी शासनपातळीवर लॉकडाउन केले आहे. यासाठी पोलीस प्रशासन व वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका या सर्वांनी मोठे योगदान दिले आहे. आजच्या घडीचे देवदूत ठरलेल्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, सर्व कर्मचारी तसेच येथे येणाऱ्या रुग्णांसाठी हा सॅनिटायझर गेट उपयोगी ठरणार आहे. सामाजिक बांधिलकी जपणाºयाा जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने सॅनिटायझर फवारणी कक्ष ग्रामीण रु ग्णालयात बसविण्यात आला आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रगती सिंग यांच्या हस्ते सॅनिटायझर फवारणी कक्षाचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक पवार होते.