'सेल्फी विथ मॉम', 'रम्य त्या आठवणी' स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:12 IST2020-05-17T22:05:10+5:302020-05-18T00:12:42+5:30

नाशिक : लोकमत सखी मंचच्या वतीने मातृदिनानिमित्त नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वांसाठी 'सेल्फी विथ मॉम' ही आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याचप्रमाणे नाशिक व जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी जुन्या आठवणींना उजाळा देणारी 'रम्य त्या आठवणी' ही लेखन स्पर्धा घेण्यात आली.

Spontaneous response to 'Selfie with Mom', 'Fine Memories' contests | 'सेल्फी विथ मॉम', 'रम्य त्या आठवणी' स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

'सेल्फी विथ मॉम', 'रम्य त्या आठवणी' स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ठळक मुद्देलोकमत सखी मंचतर्फे ‘सेल्फी विथ मॉम' ही आगळीवेगळी स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : लोकमत सखी मंचच्या वतीने मातृदिनानिमित्त नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वांसाठी 'सेल्फी विथ मॉम' ही आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याचप्रमाणे नाशिक व जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी जुन्या आठवणींना उजाळा देणारी 'रम्य त्या आठवणी' ही लेखन स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेलादेखील सखींचा उत्तम प्रतिसाद लाभला. सध्या लॉकडाउनमुळे सर्व नोकरदार महिलांसह कुटुंबातील सर्व सदस्य घरीच असून, सर्वांना पुरेसा मोकळा वेळ मिळत आहे. लोकमत सखी मंचतर्फे ‘सेल्फी विथ मॉम' ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला आई व मुलांनी मॅचिंग पोशाख, फिल्मी कॅरेक्टर, फॅन्सी ड्रेस अशा अनोख्या अंदाजात आपली सेल्फी काढून पाठविली. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक अशा : प्रथम- सोनाली कोरडे, द्वितीय- कोमल कडतान, तृतीय-शोभा देशमुख, तर उत्तेजनार्थ- पूजा जोशी, श्रृती जैन, यामिनी वानखेडे, वैशाली पगार, सविता रेवगडे, खुशबू अग्रवाल, कविता पांडे, श्रेया तोरणे, रुपाली देवरे या विजेत्यांना ‘सोनी पैठणी सिल्क साडी’ यांच्या वतीने सोनी पैठणी देण्यात येणार आहे. लोकमत सखी मंचच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी जुन्या आठवणींना उजाळा देणारी ‘रम्य त्या आठवणी’ ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत आठवणीतील बालपण, मित्र-मैत्रिणी, नातेसंबंध, संघर्ष, अविस्मरणीय क्षण अशा आठवणी सखींनी मांडल्या. त्यामुळे मनाच्या कप्प्यातील आठवणींना उजाळा मिळाला.
या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक अशा : प्रथम- वैशाली क्षीरसागर, द्वितीय- मनीषा बांठिया, तृतीय- अनिता सूर्यवंशी. उत्तेजनार्थ : प्रांजल आहेर, सुरेखा पाटकरी, मानसी देशपांडे, कविता जगताप, संगीता देसले, सुमन जोशी, निशा महाजन, छाया कोठावदे, कविता पांडे, सरिता शिंगाडे, प्राजक्ता मोडक या स्पर्धेतील विजेत्यांना ‘सृष्टी हर्बल’तर्फे आकर्षक गिफ्ट हॅम्पर देण्यात येणार आहे.लोकमत सखी मंचच्या ‘डायमंड धमाका’ या स्पर्धेतील उर्वरित कूपन दि. १ जूनपासून लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येतील. सखींनी याची नोंद घ्यावी.

Web Title: Spontaneous response to 'Selfie with Mom', 'Fine Memories' contests