अल्पबचत प्रतिनिधीचे 54 हजार लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:55 IST2018-08-07T20:00:23+5:302018-08-07T22:55:42+5:30
येथील टपाल कार्यालयातील महिला अल्पबचत प्रतिनिधीचे 54 हजार लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात महिला चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पबचत प्रतिनिधीचे 54 हजार लांबविले
सिन्नर : येथील टपाल कार्यालयातील महिला अल्पबचत प्रतिनिधीचे 54 हजार लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात महिला चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांताबाई मुरलीधर बलक (7क्, रा. खळवाडी, डॉ. आंबेडकरनगर) या अल्पबचत प्रतिनिधी म्हणून काम करतात. बलक दर महिन्याला भरणा करण्यासाठी येथील नगर परिषद कार्यालयासमोरील पोस्ट कार्यालयात जात असतात. सोमवारीदेखील त्या पोस्ट कार्यालयात रांगेत उभे होत्या. मागे उभ्या असलेल्या दोन अज्ञात महिलांनी बलक यांच्या हातातील कापडी पिशवीतून 54 हजारांची रोकड लंपास केली. काउण्टरजवळ गेल्यावर पैसे चोरीला गेल्याचे बलक यांच्या निदर्शनास आले. त्यानी आरडाओरड करेर्पयत चोरटे घटनास्थळाहून पसार झाले. याप्रकरणी बलक यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.