नाशिक - गेल्या कित्येक दिवसांपासून महायुतीत सुरू असलेली जागावाटपाची चर्चा फिस्कटली आहे. त्यामुळे महायुतीत फूट पडल्याचं चित्र नाशिकमध्ये समोर आले आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष युती करून निवडणुकीत लढणार आहेत.
नाशिकमध्ये महायुतीने एकत्रित निवडणूक लढवावी असा प्रयत्न सुरू होता. परंतु भाजपा मित्रपक्ष शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला कमी जागा देत होते. त्यामुळे जागावाटपावरून या तिन्ही पक्षात एकमत झाले नाही. त्यामुळे आता शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकत्र निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागील २-३ दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू होते. मात्र महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. त्यामुळे अखेर महायुतीत फूट पडली असून भाजपा स्वबळावर लढणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
महायुती न करता भाजपा एकटी लढणार आहे. मात्र शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युतीत शिंदेसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार आहे. साधारण ९० जागा शिंदेसेना लढवणार आहे तर ३० जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहेत. अद्याप ८ ते १० जागांवर निर्णय बाकी असल्याने या जागावाटपात बदल होण्याची शक्यता असल्याचं बोलले जाते. भाजपाकडून एकीकडे सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा विचार प्रबळ होत असतानाच रात्रीपर्यंत शिंदेसेनेसमवेत युतीच्या निर्णयाबाबत फारसे प्रयत्न झाले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर युतीत जागा कमी मिळण्याच्या शक्यतेने त्यातील शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ने रात्री उशिरापर्यंत भुजबळ फार्म हाऊसवर चर्चा केल्यावर ५९ टक्के जागा शिंदेसेना आणि ४१ टक्के जागा राष्ट्रवादी या फॉर्म्युलावर सहमती झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळले.
भाजपाकडून ८४/६/३२ अशा ऑफरची चर्चा
महायुतीतील बैठकांमध्ये भाजपा ८२, राष्ट्रवादी अजित पवार ६, तर शिंदेसेना ३४ असा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे समजते. परंतु त्यावर एकमत न झाल्याने सोमवारी या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार होता. महायुतीत लढल्यास शिंदेसेनेसह अजित पवार राष्ट्रवादी गटाची तडजोड करण्याची तयारी असल्याची चर्चा होती. अशा परिस्थितीत भाजपाचे नेते गिरीश महाजन रविवारी नाशिकला येऊन तिढा सोडवणार होते. मात्र मध्यरात्रीपर्यंत भुसे यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही.
Web Summary : Seat sharing talks failed. BJP will contest independently in Nashik Municipal Corporation elections. Shinde's Sena and Ajit Pawar's NCP will fight together. Disagreement over seat allocation led to this split, with Shinde's Sena taking a larger share.
Web Summary : सीटों के बंटवारे पर बातचीत विफल रही। नासिक नगर निगम चुनाव में भाजपा अकेले चुनाव लड़ेगी। शिंदे की सेना और अजित पवार की एनसीपी मिलकर चुनाव लड़ेंगे। सीटों के आवंटन पर असहमति के कारण विभाजन हुआ, शिंदे की सेना को बड़ा हिस्सा मिला।