विशेष बैठक : नांदगावकरांची नार-पार प्रकल्पात समावेशाची मागणी तांत्रिक अहवाल सादर करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:07 IST2018-03-10T00:07:41+5:302018-03-10T00:07:41+5:30
नांदगाव : नार-पार नदीजोड प्रकल्पात समावेश करून नांदगाव तालुक्यात तापी व गोदावरी खोºयाचे पाणी कोणत्या मार्गाने फिरवता येईल याचे चाचणी अहवाल सादर करण्याचे निर्देश जलसंपदा सचिव रा. वा. पानसे यांनी दिले.

विशेष बैठक : नांदगावकरांची नार-पार प्रकल्पात समावेशाची मागणी तांत्रिक अहवाल सादर करण्याचे निर्देश
नांदगाव : भविष्यात होणाºया नार-पार नदीजोड प्रकल्पात प्राधान्याने समावेश करून नांदगाव तालुक्यात तापी व गोदावरी खोºयाचे पाणी कोणत्या मार्गाने तालुक्यात फिरवता येईल याचे प्राथमिक तांत्रिक चाचणी अहवाल सादर करण्याचे निर्देश जलसंपदा सचिव रा. वा. पानसे यांनी दिले. गोदावरी खोरे आणि तापी खोरे पाणीवाटप होताना नांदगाव तालुका वगळला गेल्याच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार रामहरी रूपनवार, हुसनबानो खलिफे, समाधान पाटील, डॉ. प्रभाकर पवार, नाशिकचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदाचे मुख्य अभियंता कुलकर्णी, कोकण पाटबंधारे विकासचे मुख्य अभियंता अन्सारी, नाशिकच्या कडा नगर लाभक्षेत्र विकास मंडळ जलसंपदाच्या अधीक्षक अभियंता ए. एच. अहिरराव उपस्थित होत्या. नांदगावचा पाणीप्रश्न रेंगाळला आहे़