चांदवडला मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:10+5:302021-09-03T04:16:10+5:30
त्याअनुषंगाने चांदवड विधानसभा मतदारसंघात चुनाव पाठशाळा, मतदार जागरुकता मंच, शालेय व महाविद्यालयीन निवडणूक साक्षरता मंच यांच्यासाठी मतदार ...

चांदवडला मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण
त्याअनुषंगाने चांदवड विधानसभा मतदारसंघात चुनाव पाठशाळा, मतदार जागरुकता मंच, शालेय व महाविद्यालयीन निवडणूक साक्षरता मंच यांच्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी सी. एस. देशमुख यांचे अध्यक्षतेखाली चांदवड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय) चांदवड येथे झूमद्वारे वेबसंवाद / वेबिनार आयोजित करण्यात आला.
सदर वेबिनारसाठी कोविड-१९ चे अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेऊन सदर वेबसंवादास ३३ चुनाव पाठशाळा , मतदार जागरुकता मंच , शालेय व महाविद्यालयीन निवडणूक साक्षरता मंच यांच्या माध्यमातून नव मतदार उपस्थित होते. सदर वेबसंवाद अंतर्गत नव मतदारांना मतदान व मतदार नोंदणी विषयी माहिती देण्यात आली. तसेच फॉर्म क्र. ६, ७, ८, ८ अ भरण्याबाबत आवाहन करण्यात आले. सदर वेबसंवादाची तहसील कार्यालय चांदवडच्या फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब या समाज माध्यमाद्वारे प्रसिद्धी करण्यात आली आहे. सदरच्या बैठकीस तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी प्रदीप पाटील, निवडणूक नायब तहसीलदार डॉ. मीनाक्षी गोसावी उपस्थित होते.
(फोटो ०२ एम.एम.जी.१)
चांदवड येथील आय.टी.आय.मध्ये चांदवड विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या बैठकीत तहसीलदार प्रदीप पाटील, नायब तहसीलदार डॉ. मीनाक्षी गोसावी, प्राचार्य रवींद्र बागडे, अविनाश वाघ आदी.