राष्टवादी कार्यालयाच्या बाहेर फलकबाजीने चर्चेला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:55 IST2019-10-05T00:54:58+5:302019-10-05T00:55:20+5:30
परपक्षातील इच्छुकांना ऐनवेळी पक्षात प्रवेश देऊन राष्टÑवादी कॉँग्रेसने विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण केलेली असताना दुसरीकडे राष्टÑवादीच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर स्वत:ला निष्ठावान राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टी समर्थक म्हणवून घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी राष्टÑवादी व काँग्रेसचे शहराध्यक्ष, माजी आमदाराला दहा तोंडी रावण दाखवून ‘स्वार्थी गद्दार’ अशी व्यंगचित्राचे फलक लावल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

राष्टवादी कार्यालयाच्या बाहेर फलकबाजीने चर्चेला उधाण
नाशिक : परपक्षातील इच्छुकांना ऐनवेळी पक्षात प्रवेश देऊन राष्टÑवादी कॉँग्रेसने विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण केलेली असताना दुसरीकडे राष्टÑवादीच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर स्वत:ला निष्ठावान राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टी समर्थक म्हणवून घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी राष्टÑवादी व काँग्रेसचे शहराध्यक्ष, माजी आमदाराला दहा तोंडी रावण दाखवून ‘स्वार्थी गद्दार’ अशी व्यंगचित्राचे फलक लावल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी नामांकन अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने शहरात वेगवान राजकीय हालचाली व घडामोडी घडत असताना मुंबई नाक्यावरील राष्ट्रवादी भवनाच्या बाहेरच दहा तोंडी रावणाचे व्यंगचित्राचे फलक लावण्यात आले आहे. या फलकावर रावणाच्या मुख्य चेहºयाच्या ठिकाणी राष्टÑवादीचे माजी आमदार जयंत जाधव यांचा, तर दोन्ही बाजूला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांचे चेहरे आहेत. या तिघांना ‘स्वार्थी गद्दार’ व ‘घरभेदी लंका ढाये’ असे संबोधण्यात आले आहे.
बाहेरच फलक लावण्यात आल्याने शहरात त्याची जोरदार चर्चा सुरू होऊन फलक लावणारा राष्टÑवादीचा निष्ठावंत कोण? त्याचा शोध सुरू आहे.
नाशिक शहरातील चार जागांपैकी राष्टÑवादीच्या वाट्याला दोन व कॉँग्रेसच्या वाट्याला दोन जागा आल्या असून, त्यातील मध्य मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आलेला आहे व डॉ. हेमलता पाटील यांनी अर्जही दाखल केला आहे.
अन्य मतदारसंघांमध्येदेखील दोन्ही पक्षांच्या सहमतीनेच उमेदवार देण्यात आलेले असताना राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यावर अन्याय झाला व त्याच्या अन्याय करणारे फक्त तीनच नेते कसे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
या तिघांनी केलेल्या कृत्यावर फलकावर भाष्य करण्यात आले असून, त्यात ‘गद्दारांचा अन्याय निष्ठावान कदापी सहन करणार नाही’, असा इशाराही देण्यात आला आहे.