पावसाने दडी मारल्याने पेरण्या ‌खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 00:19 IST2021-07-05T23:18:51+5:302021-07-06T00:19:27+5:30

ब्राह्मणगाव : बागलाण तालुक्यातील पूर्व भागात पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Sowing was delayed due to heavy rains | पावसाने दडी मारल्याने पेरण्या ‌खोळंबल्या

पावसाने दडी मारल्याने पेरण्या ‌खोळंबल्या

ठळक मुद्देसर्वच व्यवसायांवर मंदीचे सावट

ब्राह्मणगाव : बागलाण तालुक्यातील पूर्व भागात पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

मोठा पाऊस पडावा म्हणून शेतकऱ्यांनी गोवर्धन पूजनही केले, मात्र अद्याप पाऊस येत नसल्याने शेतकरी वर्गासह शेतमजूरही हतबल झाला आहे. त्यामुळे सर्वच व्यवसायांवर मंदीचे सावट पसरले आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे विहिरीत पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनी पाणी भरून खरिपाच्या पेरणीचा प्रयत्न सुरू केला आहे, मात्र वातावरणात मोठा उष्मा असल्याने त्या पेरण्या किती यशस्वी होतील यात शंका आहे. पावसाअभावी जनावरांनाही चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मेंढपाळ वर्ग त्यामुळे त्रस्त झाला आहे. आता सर्वांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे.

Web Title: Sowing was delayed due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.