शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

नोटांच्या तुटवड्यामुळे रखडल्या रब्बीच्या पेरण्या

By admin | Updated: November 17, 2016 00:14 IST

शेतकरी हवालदिल : अवघ्या ८ टक्के क्षेत्रावर पेरण्या

नाशिक : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने सर्वच क्षेत्रांतील व्यवहार रोडावले आहेत. याचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसला आहे. ऐन पेरणीच्या मोसमात शेतकऱ्यांकडे नवीन चलन नसल्याने बियाणे आणि रासायनिक खते खरेदी करणे अशक्य झाले आहे. रब्बी हंगामाची पेरणी रखडली असून, जिल्ह्णात अवघ्या ८.५ टक्केच पेरण्या झाल्या आहेत.यंदा जिल्ह्णात समाधानकारक पाऊस पडल्याने रब्बीच्या पेरणीस पोषक वातावरण आहे. दिवाळीनंतर गहू, हरभरा पेरणी तसेच लाल-उन्हाळ कांदा लागवडीची लगबग सुरू होते. बाजरी व मक्याचे पीक काढून त्याच शेतात रब्बीची पेरणी होत असल्याने आता रब्बीच्या कामांना गती आलेली असताना केंद्र शासनाने नोटा बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांची परवड झाली असून, रासायनिक खते व बियाणे विक्रे ते त्यांना उभे करत नाहीत. परिणामी, गत आठ दिवसांपासून पेरणीला ब्रेक लागला आहे. गत वर्षी पावसाचे प्रमाण कमी असताना ८४ हजार २५४ हेक्टरवर ६३.९१ टक्के पेरणी झाली होती. या तुलनेत यंदा वरु णराजाची कृपादृष्टी असून, केवळ ९ हजार ७१३ हेक्टरवर अवघी ८.५ टक्के पेरणी झाली आहे. सिन्नर, निफाड, पेठ, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, नाशिक या सात तालुक्यांमध्ये शून्य टक्के पेरणी झालेली दिसते. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि देवळा या तीन तालुक्यांत अवघ्या ४ टक्क्यांपर्यंत पेरणी आटोपली असताना नोटा बंदीच्या निर्णयामुळे बळीराजा हैराण झाला आहे. येवला, चांदवड व मालेगाव या तीन तालुक्यांमध्ये समाधानकारक पेरणी झालेली दिसते. प्रामुख्याने गत आठ दिवसांपासून शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते उधारीतही मिळत नाही आणि रोखीत घेण्यासाठी त्यांच्या हाती नवा पैसा नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झालेली दिसते. (प्रतिनिधी)