शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

रब्बीच्या २३ टक्केच पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 12:40 AM

नाशिक : नोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्ह्यात तळ मांडून बसलेल्या अवकाळी पावसामुळे अजूनही काही तालुक्यांतील शेतजमिनी ओल्या असल्यामुळे त्याचा परिणाम रब्बीच्या लागवडीवर झाला आहे. जमिनीच्या ओलसरपणामुळे शेतीच्या मशागतीत अडचणीत निर्माण झाल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात जेमतेम २३ टक्केच पेरण्या होऊ शकल्या असून, अजून आठ ते दहा दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास रब्बी पिकांऐवजी शेतकऱ्यांना भाजीपाल्या-शिवाय पर्याय राहणार नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देउत्पादन घटणार : शेतकऱ्यांचा भर भाजीपाल्याकडे; हरबºयाला उशीर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्ह्यात तळ मांडून बसलेल्या अवकाळी पावसामुळे अजूनही काही तालुक्यांतील शेतजमिनी ओल्या असल्यामुळे त्याचा परिणाम रब्बीच्या लागवडीवर झाला आहे. जमिनीच्या ओलसरपणामुळे शेतीच्या मशागतीत अडचणीत निर्माण झाल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात जेमतेम २३ टक्केच पेरण्या होऊ शकल्या असून, अजून आठ ते दहा दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास रब्बी पिकांऐवजी शेतकऱ्यांना भाजीपाल्या-शिवाय पर्याय राहणार नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.दरवर्षी खरिपाचा हंगाम आटोपताच शेतकºयांकडून आॅक्टोबर-अखेरीस रब्बीची तयारी करताना शेतीची मशागतीचे कामे केली जात व नोव्हेंबर महिन्यात रब्बीची लागवड पूर्ण करून डिसेंबरच्या थंडीत पिकांना पोषक वातावरण मिळत असे. यंदा मात्र खरिपाबरोबरच रब्बीचा हंगामदेखील लांबणीवर पडला आहे. मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्यात जुलै, आॅगस्टपर्यंत करण्यात आल्या, त्यामुळे साहजिकच खरिपाचा हंगाम आॅक्टोबरअखेरपर्यंत लांबला. शेतातील पिके काढणीला आलेली असतानाच जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. सलग दहा ते पंधरा दिवस पावसाने झोडपून काढल्यामुळे खरिपाची पिके शेतातच जमीनदोस्त झाली तर जी काही काढून ठेवलेली पिके होती ती खळ्यातच भिजली. पावसाचा तडखा इतका जबरदस्त होता की, शेतकºयाच्या शेतात पाणी शिरून तळे साचले. पाऊस थांबल्यानंतरही कडाक्याचे ऊन पडले नाही त्यामुळे शेती भिजलेलीच राहिली. परिणामी शेतीतील आवरासावर करण्यातच शेतकरी व्यस्त झाला त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रब्बीच्या पेरणी करण्यासाठी त्याला वेळ व मशागत केलेली शेती न मिळाल्याने लागवड लांबणीवर पडली. यंदा मात्र पेरणी लांबणीवर पडल्यामुळे हरभºयाची लागवड आता होऊ शकत नाही. त्यामुळे रब्बीच्या पेरणीखालील जमिनीवर नजीकच्या काळात भाजीपाला घेण्याशिवाय दुसरा पर्यायही शिल्लक दिसत नाही. एरव्ही नोव्हेंबरअखेरीस रब्बीची पेरण्या करून शेतकरी निर्धास्त होत असताना यंदा मात्र डिसेंबरचा पहिला आठवडा उलटत असताना जिल्ह्यातील एक लाख ३१ हजार १६१ हेक्टर रब्बीच्या क्षेत्रापैकी जेमतेम २६ हजार ९४५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याचे प्रमाण २३ टक्केइतकेच असून, गेल्यावर्षी हे प्रमाण दुप्पटीने होते. सध्याचे हवामान पाहता, गव्हाच्या लागवडीसाठी अनुकूल वातावरण असले तरी, रब्बीचे प्रमुख पीक हरभरा आहे; परंतु त्याची पेरणी नोव्हेंबरमध्येच होणे आवश्यक आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक