टेलिफोनच्या ‘ट्रींग ट्रींग’चा आवाज झाला विरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:15 AM2021-09-26T04:15:02+5:302021-09-26T04:15:02+5:30

जळगाव नेऊर : सध्याच्या युगात चलभाष यंत्र सोशल माध्यम आणि संपर्कासाठी वेगवेगळी साधने उपलब्ध झाल्याने पूर्वीपासून सेवा देत असलेला ...

The sound of 'Tring Tring' on the telephone became rare | टेलिफोनच्या ‘ट्रींग ट्रींग’चा आवाज झाला विरळ

टेलिफोनच्या ‘ट्रींग ट्रींग’चा आवाज झाला विरळ

Next

जळगाव नेऊर : सध्याच्या युगात चलभाष यंत्र सोशल माध्यम आणि संपर्कासाठी वेगवेगळी साधने उपलब्ध झाल्याने पूर्वीपासून सेवा देत असलेला टेलिफोन मात्र बाजूला पडला आहे. त्याचे अस्तित्व शासकीय किवा स्थानिक संस्था कार्यालयापुरतेच मर्यादीत झाले आहे. टेलिफोनची रिंग कानावर पडणे आता दुर्मीळ झाल्याने येणाऱ्या पिढीला फक्त टेलिफोनचे चित्र दाखवावे लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भरमसाठ ऑफर देणाऱ्या दूरसंचार कंपन्यांमुळे मोबाइलचे महत्त्व वाढत चालले आहे. दूरध्वनीच्या तुलनेत मोबाइलचा वापर करणे सहज शक्य आहे. शासकीय कार्यालयामध्ये तसेच ज्या व्यक्ती व संस्थेला ब्रॉडब्रॅण्ड इंटरनेट गरज आहे. अशा व्यक्ती व संस्थेला लँडलाइनच्या टेलिफोन क्रमांकासाठी केबल घेणे आवश्यक असल्याने संबंधित कार्यालयात दूरध्वनी सेवा आढळून येते. घरामधून मात्र दूरध्वनी सेवा जवळपास गायब झाली असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. भारत संचार निगम लिमिटेड तसेच खासगी कंपन्यानी ग्रामीण भागात सेवा उपलब्ध करून दिली. दूरध्वनीच्या तुलनेत मोबाइलचा वापर करणे सहज शक्य झाले. मोबाइलमुळे संबंधित व्यक्तीला कधीही संपर्क साधता येत असल्याने मोबाइल सेवा देण्यात अनेक कंपन्या उतरल्या, त्यामुळे त्यांच्या स्पर्धा निर्माण होऊन अत्यंत कमी दरात मोबाइल सेवा उपलब्ध होत असल्याने टेलिफोन वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली. आज जवळपास सर्व व्यक्तींकडे मोबाइल असल्याने टेलिफोन वापरणे अनेकांनी बंद केल्याने लँडलाइन टेलिफोन कालबाह्य होते की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.

-------------------

क्वाइन बॉक्सदेखील होणार नामशेष

सध्या मोबाइल सेवेचे महत्त्व वाढले.

टेलिफोनपेक्षा जलद आणि स्वस्त सेवा मोबाइलची आहे, त्यामुळे मोबाइलचे महत्त्व वाढले आहे. जिथे जाऊ त्याठिकाणी सहज मोबाइलचे नेटवर्क उपलब्ध होत असल्याने मोबाइलचे टेलिफोनपेक्षा अधिक महत्त्व वाढले आहे. एका दशकापूर्वी क्वाईन बॉक्स हे दूरसंचाराचे महत्त्वाचे साधन बनले होते. एका रुपयात मिनीटभर बोलण्याची संधी या क्वाईन बॉक्समुळे मिळत होती; मात्र मोबाइल सेवा यापेक्षा स्वस्त झाल्याने क्वाईन बॉक्स नामशेष होत चालले आहे.

Web Title: The sound of 'Tring Tring' on the telephone became rare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.